Vegetable Farming : भारतात अलीकडे पारंपरिक पिकांसोबतच भाजीपाला पिकांची (Vegetable Crop) देखील मोठ्या प्रमाणात शेती (Farming) केली जात आहे. अल्प कालावधीत आणि अल्प खर्चात काढणीसाठी तयार होणाऱ्या भाजीपाला पिकांच्या लागवडीतून शेतकऱ्यांना बक्कळ पैसा (Farmer Income) मिळत आहे.
मित्रांनो खरे पाहता हिवाळ्याच्या दिवसात भाजीपाला पिकांना मोठी मागणी असते. अशा परिस्थितीत आज आपण ऑक्टोबर महिन्यात कोणत्या भाजीपाला वर्गीय पिकांची शेती (Agriculture) सुरू केली जाऊ शकते या विषयी थोडक्यात पण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग शेतकरी मित्रांनो (Farmer) वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
कारल्याची लागवड
कारले कॅन्सर आणि मधुमेह यांसारख्या आजारांवर औषधाप्रमाणे काम करतो. हे एक सदाहरित पीक आहे, ज्याची लागवड कोणत्याही हंगामात करता येते. 1 एकर शेतजमिनीत त्याची लागवड करण्यासाठी 20 ते 25 हजार रुपये खर्च करावे लागतात, त्यानंतर शेतकरी दीड ते दोन लाखांचे उत्पन्न आरामात घेऊ शकतात. मंडप पद्धतीने 1 एकरात कारले पिकाची लागवड केल्यास 50 ते 60 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. इतर वेलीवर्गीय भाजीपाल्यांपेक्षा जास्त उत्पादन मिळते. हिवाळ्यापासून उन्हाळ्यापर्यंत त्याची मागणी कायम असते.
मेथीची लागवड
मेथीची भजी तसेच याची भाजी हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात खाल्ले जात असते. इतकंच नाही तर बरेच लोक मेथी सुकवून मसाला म्हणून वापरतात. याच्या बिया आणि पानांमध्ये लपलेल्या औषधी गुणधर्मामुळे त्याची मागणी वर्षभर राहते, मात्र त्याच्या लागवडीची योग्य वेळ ऑक्टोबर-नोव्हेंबर आहे. ही भाजी उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलला ब्रेक देणारी आहे, जी शेतकऱ्यांसाठीही वरदान ठरू शकते. मेथीची पेरणी झाली की, शेतकरी 3 ते 4 वेळा काढणी करून उत्पादन मिळवू शकतो. तुम्हाला हवे असल्यास पारंपरिक पिकांबरोबरच मेथीची लागवड करून तुम्ही अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकता.
गाजर शेती
गाजर बीटा-कॅरोटीनचा एक महत्त्वाचा स्रोत मानला जातो. हे केवळ दृष्टीच वाढवत नाही तर त्यामुळे त्वचा सुंदर आणि मुलायम देखील होते. हिवाळा सुरू झाला की हलव्यासाठी गाजरांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. शेतकर्यांना हवे असल्यास ते गाजराची आंतरपीक म्हणून इतर पिकात लागवड करून गाजराचे चांगले उत्पादन घेऊ शकतात. गाजराची उंच बेड तयार करून पेरणी केल्यास खूप चांगले उत्पादन मिळते. विशेषत: पुसा रुधिरा आणि पुसा असिता या गाजराच्या जाती अल्पावधीत खूप चांगले उत्पादन देतात आणि आकर्षक पोत असल्यामुळे बाजारात सहज विकल्या जातात.