Vegetable Farming: भारतात गेल्या अनेक दशकांपासून शेतीमध्ये (Farming) मोठा बदल बघायला मिळत आहे. खरं पाहता आता भारतात खानपानाच्या गोष्टी देखील बदलत चालल्या आहेत. पूर्वी फक्त खेड्यात खाल्ल्या जाणाऱ्या रानभाज्या आता शहरात देखील मोठ्या आवडीने खाल्ल्या जात आहेत.
अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी (Farmer) सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. शेतकरी बांधव या बदललेल्या परिस्थितीचा फायदा घेत रानभाज्यांची शेती करून चांगली कमाई (Farmer Income) करू शकणार आहेत. मित्रांनो करटोली (Spiny Gourd Crop) हे देखील अशीच एक रानभाजीं आहे.
ही जंगली भाजी कारल्या सारखी दिसते मात्र आकाराने कारल्यापेक्षा छोटी असते. उत्तर प्रदेश मधील बुंदेलखंडच्या काही भागात या जंगली भाजीची मोठ्या प्रमाणात शेती होत आहे. विशेष म्हणजे या भाजीची शेती शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. अशा परिस्थितीत आज आपण करटोली या रानभाजीची कशा प्रकारे शेती शेतकरी बांधव करत आहेत याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
करटोली (Spiny Gourd Farming) किंवा जंगली कारल म्हणून ओळखल्या जाणारे हे भाजीपाला पीक (Vegetable crop) पावसाळ्यात बंपर उत्पादन देते. बुंदेलखंड मध्ये या भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात शेती होत असून तेथील बाजारपेठेत याला मोठी मागणी आहे.
करटोली लागवड करणे महत्त्वाचे का आहे
चंबळच्या कोरडवाहू भागात करटोलीची लागवड शेतकऱ्यांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. वेलींवर वाढणारे आणि कारल्याप्रमाणे दिसणारे हे फळ भाजीपाला, लोणची आणि आयुर्वेदिक औषधे बनवण्यासाठी वापरतात. याचे रोज सेवन केल्याने मधुमेह, रक्तदाब यांसारख्या समस्या नियंत्रणात राहतात.
याच्या सेवनाने दृष्टी कमी होणे, डोकेदुखी, केस गळणे, पोटातील संसर्ग, खोकला, कानदुखी, कावीळ यांसारख्या आजारांमध्ये मोठा आराम मिळतो. त्यामध्ये असलेले कार्बोहायड्रेट्स, प्रथिने आणि फायबर्स शरीराचे पोषण करतात आणि रोगांपासून संरक्षणात्मक कवच देतात.
हलक्या पावसात करटोली चांगली वाढते आणि चांगले उत्पादन मिळते
करटोली ही एक नैसर्गिक भाजी आहे, जी जंगली भागात स्वतःच उगवते. याच्या वेली कमी पाण्यात देखील भरपूर पसरतात, परंतु असं असलं तरी पाऊस पडल्यावरच ते चांगले उत्पादन देऊ शकतात.
सुरुवातीला पीक लावल्यावर त्याची फळे येण्यास थोडा उशीर होतो, परंतु जेव्हा पाऊस पडतो तेव्हा त्याची वाढ आणि फळ उत्पादन जलद मिळते.
करटोलीची काढणी दर तीन महिन्यांनी करता येते. याला 90 ते 100 रुपये किलो दराने बाजारात भाव मिळतो.
एकदा लागवड केल्यानंतर करटोलीचे पीक पुढील 8 ते 10 वर्षे फळ देऊ शकते. शेतकर्यांची इच्छा असेल तर ते या जंगलात वाढणाऱ्या करटोली पिकाची आंतरपीक म्हणून देखील लागवड करू शकतात.
करटोली किंवा जंगली कारले या पिकांची प्रति हेक्टरी सेंद्रिय शेती केल्यास सुमारे 250 ते 300 क्विंटल फळे मिळू शकतात.