Vegetable Farming : देशात भाजीपाला वर्गीय पिकांची (Vegetable Crop) मोठ्या प्रमाणात शेती (Farming) केली जाते. विशेष म्हणजे भाजीपाला पिकाला आपल्या देशात मोठी मागणी असते. या भाज्यांमध्ये भेंडी (Okra Crop) ही देखील एक लोकप्रिय भाजी आहे.
सामान्य भारतीयांच्या घरात हे मोठ्या आवडीने खाल्ले जाते. देशातील शेतकरी बांधव भेंडीची लागवड (Okra Farming) मोठ्या प्रमाणात करतात. शेतकरी बांधव (Farmer) हिरव्या भेंडीची मोठ्या प्रमाणात शेती करत आहेत. या शेतीतून देखील शेतकऱ्यांना चांगली कमाई होत आहे.
मात्र आज आपण लाल भेंडीच्या शेती (Red Okra Farming) विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो लाल भेंडी औषधी गुणधर्मांनी समृद्ध असल्याने या भेंडीला बाजारात मोठी मागणी असते शिवाय या भेंडीला सामान्य भेंडी पेक्षा अधिक दर मिळत असतो. अशा परिस्थितीत या लाल भेंडीची शेती शेतकऱ्यांना मालामाल बनवून सोडणार आहे. आज आपण देखील लाल भेंडीची लागवड कशा पद्धतीने केली जाऊ शकते याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो.
लाल भेंडी लागवड कधी करावी
लाल भेंडीचा रंग, मोहकता आणि चव लोकांच्या पसंतीस खरी उतरत आहे. त्याच्या लागवडीसाठी पावसाळ्याचा काळ अतिशय योग्य मानला जातो. या लाल भेंडीची लागवड देखील हिरव्या भेंडीप्रमाणे केली जाते. या लाल भेंडी पिकासाठी चांगला निचरा होणारी वालुकामय चिकणमाती उत्तम असते. ज्या जमिनीचे pH मूल्य 6.5 – 7.5 च्या दरम्यान असते अशा शेत जमिनीत या पिकाची लागवड करण्याचा सल्ला दिला जातो. सूर्यप्रकाश योग्य प्रकारे पोहोचेल अशा ठिकाणी या पिकाची शेती करावी.
लाल भेंडी हिरव्या भेंडीपेक्षा वेगळी कशी आहे?
या लाल भेंडीमध्ये हिरव्या भाज्यांमध्ये आढळणारे क्लोरोफिल नसते. या लाल भेंडीत अँथोसायनिनचे प्रमाण जास्त असते जे की त्याच्या लाल रंगाचे कारक आहे. इतकंच नाही तर शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की यामध्ये सामान्य भेंडीपेक्षा जास्त लोह, कॅल्शियम आणि झिंक असते. सामान्य हिरव्या भेंडीप्रमाणे, ही भेंडी लावण्यास देखील सोपी आहे. लाल भेंडी लागवडीसाठी देखील हिरव्या भेंडी लागवडी प्रमाणेच खर्च होतो. इतकेच नाही तर त्याच्या लाल रंगामुळे त्यात अँटीऑक्सिडंट्स जास्त असतात आणि शास्त्रज्ञांनी ते शिजवण्याऐवजी सॅलड म्हणून खाण्याचा सल्ला दिला आहे.
मोठा नफा
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, लाल भेंडी लावण्यासाठी जास्त खर्च येत नाही. आणि बाजारात हिरव्या रंगाच्या भेंडीपेक्षा जास्त दराने लाल भेंडी विकली जाते. मंडईंमध्ये लाल भेंडी सुमारे 500 रुपये किलोने विकली जाते. त्यानुसार 1 एकरमध्ये लाल भेंडीची लागवड करून शेतकरी चांगला नफा मिळवू शकतात.