Vegetable Farming: भारतात मोठ्या प्रमाणात भाजीपाला शेती (Agriculture) केली जाते. राज्यातील शेतकरी बांधव देखील विविध भाजीपाला पिकांची (Vegetable Crop) शेती करत असतात. गवार हे देखील एक प्रमुख भाजीपाला वर्गीय पीक आहे. गवार या भाजीपाला वर्गीय पिकांची खरीप हंगामात (Kharif Season) तसेच उन्हाळी हंगामात शेतकरी बांधव (Farmer) मोठ्या प्रमाणात शेती करत असतात.
विशेष म्हणजे गवार शेतीतून (Guar farming) शेतकरी बांधवांना चांगले उत्पन्नदेखील मिळत असते. मात्र असे असले तरी जाणकार लोक शेतकरी बांधवांना गवारच्या सुधारित जातींची (Guar Variety) लागवड करण्याचा सल्ला देत असतात. जाणकार लोकांच्या मते जर शेतकरी बांधवांनी गव्हाच्या सुधारित जातींची पेरणी केली तर निश्चितच गवार पासून चांगले उत्पादन मिळणार आहे शिवाय उत्पादन खर्चात देखील बचत होणार आहे.
सुधारित जातींची पेरणी केल्यास गवारच्या पिकावर रोगराई कमी प्रमाणात येत असते. अशा परिस्थितीत गव्हाचे चांगले दर्जेदार उत्पादन शेतकरी बांधवांना मिळत असते. यामुळे आज आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी गवारच्या काही सुधारित जातींची माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया गवार या प्रमुख भाजीपाला वर्गीय पिकाच्या काही सुधारित जाती.
गवार पिकाच्या सुधारित जाती
सुरती गवार – मित्रांनो गवार पिकाची ही एक सुधारित जात आहे. जाणकार लोकांच्या मते गवारच्या सुरती जातीच्या झाडाला फांद्या अधिक प्रमाणात असतात. शेतकरी बांधवांनी जर गवारच्या या जातीची आक्टोबर नंतर व उन्हाळ्यामध्ये लागवड केली तर शेतकरी बांधवांना यातून चांगले उत्पन्न मिळते.
जाणकार लोकांच्या मते या जातीच्या गवारची बाजारात मोठी मागणी असते. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना या पिकातून चांगली कमाई होणार आहे. या जातीच्या शेंगा जास्त पातळ, लांब, जाडसर व आकाराने थोड्या मोठ्या असतात तसेच या गवारची चव थोडी गुळचट असते. असं सांगितलं जात की या जातीच्या गवार पिकाला शेंगांचा गुच्छ लागत नाही.
पुसा सदाबहार – ही देखील गवारची एक सुधारित जात आहे. ही जात सरळ व उंच वाढणारी आहे. पुसा सदाबहार या गवारच्या जातीची उन्हाळी व खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात लागवड केली जात असून विद्यापीठामार्फत देखील उन्हाळी व खरीप हंगामात या जातीच्या लागवडीची शिफारस केले गेली आहे.
पुसा सदाबहार जातीच्या शेंगा लांब असतात व हिरव्या रंगाच्या असतात. या जातीच्या गवार पिकापासून जवळपास 55 दिवसांनी उत्पादन मिळण्यास सुरवात होते. निश्चितच अल्प कालावधीत तयार होणारी ही जात शेतकरी बांधवांना चांगला बक्कळ पैसा कमवून देऊ शकते.