Vegetable Farming: अलीकडे शेतीमध्ये (Farming) नवयुवक तरुण मोठ्या प्रमाणात पदार्पण करत आहेत. नवयुवक उच्चशिक्षित तरुण शेती व्यवसायाकडे करिअर म्हणून बघत असल्याचे चित्र आहे. खरं पाहता शेतीव्यवसायातून अतिशय कवडीमोल उत्पन्न (Farmer Income) मिळत असल्याचे कारण सांगत अलीकडे अनेक शेतकरी बांधव (Farmer) शेतीपासून दुरावत असल्याचे चित्र आहे.
मात्र जर शेती व्यवसायात काळाच्या ओघात बदल केला तर निश्चितच शेतीतून देखील लाखोंची कमाई सहज शक्य आहे. अनेक शेतकरी बांधवांनी शेतीमध्ये बदल करण्यास सुरुवात देखील केली आहे. आता देशातील शेतकरी बांधव कमी खर्चात आणि कमी दिवसात उत्पादन देण्यास तयार होणाऱ्या भाजीपाला पिकांची (Vegetable crop) मोठ्या प्रमाणात शेती करत आहेत.
भाजीपाला शेती शेतकरी बांधवांना चांगली फायदेशीर देखील ठरत आहे. मित्रांनो वांगे (Brinjal Crop) हे देखील एक प्रमुख भाजीपाला पीक आहे. या पिकाची आपल्या राज्यातही मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव शेती करत आहेत. अशा परिस्थितीत आज आपण वांग्याच्या शास्त्रोक्त शेती (Brinjal Farming) विषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया वांग्याची शास्त्रोक्त शेती.
वांग्याच्या शेतीतील काही महत्वाच्या बाबी
खरीप आणि रब्बीसह सर्व हंगामात वांग्याची शेती संपूर्ण भारतवर्षात केली जाते. वांग्याची लागवड आंतरपीक म्हणूनही केली जाते. वांग्याचे अधिक उत्पादन घेण्यासाठी बियाण्याची योग्य लागवड करावी. दोन झाडांमधील अंतराची काळजी घ्यावी. दोन झाडे आणि दोन ओळींमधील अंतर 60 सें.मी. असावे तसेच बियाणे पेरण्यापूर्वी शेताची चांगल्या पद्धतीने नांगरणी करावी आणि जमीन समतल करून घ्यावी. त्यानंतर शेतात आपल्या गरजेनुसार बेड तयार करावेत. वांग्याच्या लागवडीत एकरी 300 ते 400 ग्रॅम बियाणे लागत असते. पेरणीनंतर बिया 1 सेमी खोलीपर्यंत मातीने झाकल्या पाहिजेत. मित्रांनो वांग्याचे पीक दोन महिन्यांत तयार होते.
वांग्याच्या पिकासाठी सिंचन कसे केले जाते बर…!
वांग्याच्या लागवडीत जास्त उत्पादन मिळविण्यासाठी योग्य वेळी पाणी देणे अत्यंत आवश्यक आहे. उन्हाळ्यात दर 3-4 दिवसांनी पाणी द्यावे आणि हिवाळ्यात 12 ते 15 दिवसांनी पाणी द्यावे.धुक्याच्या दिवसात पिकाचे संरक्षण करण्यासाठी जमिनीतील ओलावा आणि पाणी नियमित ठेवा. वांगी पिकात पाणी साचणार नाही याची विशेष काळजी घ्यावी, कारण वांगी पिक उभे पाणी सहन करू शकत नाही.
वांग्याच्या शेतीसाठी किती खर्च येईल बर…!
एक हेक्टर वांग्याच्या लागवडीसाठी पहिल्या काढणीपर्यंत सुमारे दोन लाख रुपये खर्च येणार आहे. त्याच वेळी, वर्षभर देखभालीसाठी आणखी 2 लाख रुपये खर्च होऊ शकतो. म्हणजेच संपूर्ण वर्षभरात वांग्याच्या लागवडीवर तुम्हाला सुमारे 4 लाख रुपये खर्च करावे लागतील. त्याचबरोबर एका वर्षात एक हेक्टर मधून 100 टन वांग्याचे उत्पादन होऊ शकते.
किती नफा मिळेल बर…!
सरासरी 10 रुपये किलो दराने वांगी विकली तरी वांग्याच्या पिकातून किमान 10 लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल. म्हणजेच 4 लाख रुपये खर्च काढल्यास वांगी पिकातून वर्षभरात सुमारे 6 लाख रुपयांचा नफा मिळेल.