Vegetable Farming: देशातील शेतकरी बांधव (Farmer) गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकांची लागवड (Vegetable Farming) करत आहेत. विशेष म्हणजे भाजीपाला (Vegetable Crop) शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर देखील ठरत आहे. कारले (Bitter Gourd Crop) हे देखील एक प्रमुख भाजीपाला पिकं आहे.
याची देखील शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात शेती (Farming) करत असतात. राज्यात देखील कारल्याची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. मित्रांनो कारल्याची लागवड निश्चितचं शेतकरी बांधवांना फायदा (Farmer Income) मिळवून देत असते मात्र अनेकदा कारले पिकावर हवामान बदलाचा परिणाम होत असतो यामुळे या पिकातून अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळत असते.
मात्र जर शेतकरी बांधवांनी मंडप पद्धतीने कारल्याची लागवड केली तर त्यांना निश्चितच यातून चांगली कमाई होणार आहे. यामुळे आज आपण मंडप पद्धतीने कारले लागवड विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या विषयी.
हायब्रीड कारले लागवड या पद्धतीने करा
जाणकार लोकांच्या मते, उत्तम निचरा होणारी वालुकामय चिकणमाती असलेली जमीन संकरित कारल्याच्या लागवडीसाठी उत्तम आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की कारले वेल मध्यम उष्ण तापमानात चांगले फुलतात आणि अशा हवामाणात यातून चांगली कमाई होते.
एक हेक्टर क्षेत्रामध्ये कारल्याच्या लागवडीसाठी 1.8 ग्रॅम बियाणे आवश्यक आहे, ज्याची लागवड रोपवाटिकेत बीजप्रक्रिया केल्यानंतरच करावी.
रोपवाटिकेमध्ये रोपे तयार केल्यानंतर शेत सेंद्रिय पद्धतीने तयार करून कारले रोपांची ओळीत लागवड करावी.
वेल व्यवस्थित पसरवण्यासाठी शेतकरी मंडप बनवतात, ज्यामुळे उत्पादन आणि उत्पादकता दोन्ही वाढते. यामुळे कारल्याची लागवड नेहमी मंडप पद्धतीने केले पाहिजे
मंडप पद्धतीने कारले लागवड केल्यास रोगराई कमी प्रमाणात येते. शिवाय यामुळे उत्पादनात वाढ होते. मंडप पद्धतीने कारल्याची लागवड केल्यास कारल्याचे पीक कूजण्यापासून वाचते. या पद्धतीने लागवड केल्यास जास्त पावसामुळे कारल्याचे पीक खराब होत नाही. यामुळे कारल्याच्या उत्पादनात वाढ होत असल्याचा दावा केला जातो.
ही खबरदारी घ्या
कारल्याची फळे आणि वेलींपेक्षा त्याच्या मुळांवर कीटक आणि रोगांचा प्रादुर्भाव जास्त असतो, त्यामुळे मळ्यासोबतच मुळांवरही लक्ष ठेवावे.
कीटक-रोगांच्या प्रतिबंधासाठी फक्त सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर करा. शेतकऱ्यांना हवे असल्यास ते जीवनमृत आणि नीमस्त्राचाही वापर करू शकतात.
संकरित कारल्याच्या भाजीपाल्यापासून बियाणे घेऊन पेरणी केल्याने पिकामध्ये अनेक समस्या निर्माण होतात, त्यामुळे त्यांचा वापर करू नये.
वास्तविक, कारल्याचे संकरित बियाणे प्रयोगशाळेतच तयार केले जाते, ज्याची लागवड एकदाच केली जाते, त्यामुळे प्रमाणित दुकानातूनच चांगल्या दर्जाचे बियाणे खरेदी करा.