Vande Sadharan Train List : वंदे भारत एक्सप्रेसच्या घवघवीत अशा यशानंतर गदगद झालेल्या भारतीय रेल्वेकडून लवकरच वंदे साधारण एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. विशेष म्हणजे चेन्नई येथील कोच फॅक्टरी मध्ये वंदे साधारण एक्सप्रेस ट्रेनचे प्रोटोटाइप देखील तयार झाले आहे. हे प्रोटोटाईप मुंबईमध्ये परीक्षणासाठी दाखल सुद्धा झाले आहे.
खरंतर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होऊन आता पाच वर्षांचा काळ उलटला आहे. या पाच वर्षात ही ट्रेन प्रवाशांमध्ये विशेष लोकप्रिय बनली आहे. ही गाडी शताब्दी एक्सप्रेस पेक्षा अधिक लोकप्रिय बनली आहे. रेल्वे प्रवाशांची पसंती पाहता या गाडीला देशातील विविध मार्गांवर चालवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मीडिया रिपोर्ट नुसार मार्च 2024 पर्यंत देशातील एकूण 75 महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. सध्या 34 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी धावत आहे. मात्र असे असले तरी या गाडीचे तिकीट दर शताब्दी एक्सप्रेस पेक्षा अधिक आहेत. यामुळे ही गाडी सर्वसामान्यांना परवडत नाही असा आरोप केला जात आहे. हेच कारण आहे की आता सर्वसामान्यांसाठी वंदे साधारण ट्रेन चालवली जाणार आहे.
वंदे साधारण ट्रेन ही नॉन एसी गाडी राहणार असून साहजिकच या गाडीचे तिकीट दर कमी राहणार आहेत. विशेष म्हणजे वंदे साधारण एक्सप्रेसचा ताशी वेग 130 किलोमीटर एवढा राहणार आहे. म्हणजेच वेगाच्या बाबतीत वंदे भारत एक्सप्रेस सारखीच ही गाडी देखील सुसाट धावणार आहे.
यामुळे या गाडीला प्रवाशांची चांगली पसंती लाभेल असा आशावाद व्यक्त होत आहे. दरम्यान वंदे साधारण ट्रेनचे पाच मार्ग रेल्वे बोर्डाने निश्चित केले आहेत. विशेष बाब म्हणजे आणखी 18 मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. म्हणजेच जवळपास देशातील 23 महत्त्वाच्या मार्गांवर ही वंदे साधारण ट्रेन सुरू होऊ शकते.
यापैकी पाच मार्ग तर निश्चितच झाले आहेत मात्र उर्वरित अठरा मार्गांबाबत अंतिम निर्णय रेल्वे बोर्डच घेणार आहे. अशा परिस्थितीत, आता आपण देशातील कोणत्या पाच मार्गांवर वंदे साधारण ट्रेन धावण्याचे निश्चित झाले आहे आणि कोणते 18 मार्ग हे प्रस्तावित आहेत याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत.
कोणत्या पाच मार्गांवर धावणार
मिळालेल्या माहितीनुसार, नवी दिल्ली ते पाटणा, नवी दिल्ली ते हावडा, नवी दिल्ली ते हैदराबाद, नवी दिल्ली ते मुंबई आणि एर्नाकुलम- गुवाहाटी या पाच मार्गांवर वंदे साधारण ट्रेन चालवण्याचे नक्की झाले आहे. हे मार्ग रेल्वे बोर्डाकडून अंतिम करण्यात आले आहेत.
वंदे साधारणचे प्रस्तावित मार्ग कोणते
१) मुंबई – छापरा
२) मंगळूर – कोलकता
३) मुंबई – रकसुल
४) नागरकोईल – हैदराबाद
५) मुंबई – जम्मू तावी
६) नागरकोईल – ओखा
७) अहमदाबाद – दरभंगा
८) तानकपुर – सिंगरौली
९) पोरबंदर – कोलकता
१०) जम्मू तावी – गुवाहाटी
११) उधना – जयनगर
१२) गोरखपूर – मुंबई
१३) लुधियाना – दरभंगा
१४) मुझफ्फरपूर – अहमदाबाद
१५) हावडा – अहमदाबाद
१६) वाराणसी – दरभंगा
१७) सहारासा – अमृतसर
१८) मंगळूर – मुंबई
याचा अर्थ राजधानी मुंबईला 6 वंदे साधारण ट्रेनचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. यापैकी एक मार्ग अंतिम झाला आहे तर उर्वरित पाच मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहे. पुण्याला मात्र वंदे साधारण ट्रेनची भेट लवकर मिळणार नसल्याचे चित्र आहे. मात्र जेव्हा वंदे साधारणचा पुढील टप्पा अंतिम केला जाईल तेव्हा पुण्याला वंदे साधारण ट्रेनची भेट देण्यासाठी प्रयत्न होतील अशी आशा आहे.