Vande Metro Train : गेल्या काही दिवसांपासून वंदे भारत मेट्रो ट्रेनच्या मोठ्या चर्चा पाहायला मिळत आहेत. खरेतर, 2019 मध्ये सुरू झालेल्या वंदे भारत एक्सप्रेसच्या अभूतपूर्व यशानंतर आता वंदे भारत एक्सप्रेसचे स्लीपर वर्जन आणि मेट्रो वर्जन लाँच होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सद्यस्थितीला वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू आहे.
यातील आठ मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत. राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते साईनगर शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, नागपूर ते बिलासपूर आणि इंदोर ते नागपूर या महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे.
विशेष म्हणजे या गाड्यांना प्रवाशांनी मोठा प्रतिसाद दाखवला आहे. या हाय स्पीड ट्रेनमुळे प्रवाशांचा प्रवास गतिमान झाला आहे. ही हाय स्पीड ट्रेन सुरू होऊन जवळपास पाच वर्षांचा काळ पूर्ण झाला आहे अन या पाच वर्षांच्या काळात या गाडीने खूपच अधिक लोकप्रियता मिळवली आहे.
दरम्यान आता वंदे भारत एक्सप्रेस च्या धरतीवर वंदे मेट्रो ट्रेन सुरू होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार जुलै 2024 मध्ये वंदे मेट्रो गाडी रुळावर येण्याची शक्यता आहे. ही गाडी लोकल गाड्यांच्या धर्तीवर धावणार असल्याची बातमी समोर येत आहे.
वंदे मेट्रोची पहिली झलक नुकतीच एका व्हिडिओतून पाहायला मिळाली आहे. हा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. पंजाबमधील कपूरथला रेल कोच फॅक्टरीमध्ये या गाडीचे कोच तयार केले जात आहेत. पहिल्या टप्प्यात 50 गाड्या बनवल्या जाणार आहेत.
यानंतर मग ही संख्या 400 पर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न राहणार आहे. वंदे मेट्रो ट्रेनचा वेग हा ताशी 100 ते 250 किलोमीटर पर्यंत असणार असा दावा केला जात आहे. या गाडीमध्ये 12 कोच राहणार आहेत मात्र 16 पर्यंत वाढवले जाऊ शकणार आहेत.
कोणत्या मार्गावर धावणार वंदे मेट्रो ट्रेन ?
मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवायच झालं तर देशातील पहिली वंदे मेट्रो ट्रेन आपल्या महाराष्ट्राला मिळण्याची दाट शक्यता आहे. वंदे मेट्रो ही पहिल्यांदा मुंबईमध्ये सुरू होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मुंबईमध्ये लोकल गाड्यांना मोठी मागणी असल्याने देशातील पहिली वंदे मेट्रो ट्रेन मुंबईमध्ये सुरू होऊ शकते असा दावा केला जात आहे. मुंबईनंतर राजधानी दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता येथेही वंदे मेट्रो चालवण्याची योजना असल्याची माहिती समोर येत आहे.