Vande Bharat Train : मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी गुड न्यूज समोर आली आहे. खरे तर, 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 ला संपणार आहे. यामुळे आता भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कोणत्याही क्षणी आगामी निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत.
निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यात की, त्या दिवसापासूनच देशात आचारसंहिता लागू होणार आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीत मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आता सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून, केंद्रातील मोदी सरकारच्या माध्यमातून अनेक महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेतले जात आहेत.
निवडणुकांसाठी अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 मार्च 2024 ला 10 नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या दहा वंदे भारत एक्सप्रेस मध्ये मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद या वंदे भारत एक्सप्रेसचा देखील समावेश आहे. सध्या स्थितीला, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर वंदे भारत ट्रेन अहमदाबाद मार्गे धावत आहे. अर्थातच अहमदाबादला मिळणारी ही दुसरी वंदे भारत ट्रेन राहणार आहे.
तसेच मुंबई सेंट्रल या रेल्वे स्थानकावरून धावणारी ही दुसरी ट्रेन राहणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आज मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दहा वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.
यात मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद दरम्यानच्या गाडीचा देखील समावेश असेल. पण, या गाडीचे जरी आज उद्घाटन होणार असले तरी देखील प्रत्यक्षात ही गाडी पश्चिम रेल्वेच्या वतीने १३ मार्चपासून चालवली जाणार आहे. अहमदाबाद आणि मुंबई सेंट्रलदरम्यानची ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस ट्रेन उद्या बुधवारपासून रेल्वे प्रवाशांसाठी सुरू केली जाणार आहे.
सध्या पश्चिम रेल्वेवर गांधीनगर-मुंबई सेंट्रल, अहमदाबाद (साबरमती)- जोधपूर, अहमदाबाद-जामनगर, इंदौर-भोपाळ- नागपूर आणि उदयपूर- जयपूर अशा ५ वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. या ट्रेनमुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील वंदे भारतची संख्या वाढणार आहे. आता आपण या ट्रेनचे वेळापत्रक आणि थांबे थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कस राहणार वेळापत्रक
ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन फक्त रविवारी धावणार नाही. इतर दिवशी ही ट्रेन सुरु राहील. ट्रेन क्रमांक २२९६२ ही अहमदाबाद-मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्स्प्रेस अहमदाबादहून ६:१० वाजता सुटेल आणि ११:३५ वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचणार आहे.
या वंदे भारत एक्सप्रेसच्या परतीच्या प्रवासा बाबत बोलायचं झालं तर ट्रेन क्रमांक २२९६१ मुंबई सेंट्रल-अहमदाबाद वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई सेंट्रल येथून दुपारी 3 वाजून 55 मिनिटांनी सुटणार आहे आणि ही गाडी रात्री 9:25 मिनिटांनी अहमदाबाद रेल्वे स्थानकावर पोहचणार आहे.
कुठं थांबणार ही हायस्पीड ट्रेन ?
पश्चिम रेल्वेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या हाय स्पीड ट्रेनला या मार्गावरील वडोदरा, सुरत, वापी आणि बोरिवली या चार रेल्वे स्थानकांवर थांबा दिला जाणार आहे. एकंदरीत पश्चिम रेल्वे मार्गावरील या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर ये-जा करणाऱ्यांना या गाडीचा खूप मोठा फायदा होणार आहे.