Vande Bharat Train : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या शहरांना वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे.
त्यामुळे खानदेशमधील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार अशी आशा व्यक्त होत आहे. खरे तर, वंदे भारत एक्सप्रेस ही 2019 मध्ये सुरू झालेली संपूर्ण भारतीय बनावटीची हाय स्पीड ट्रेन आहे. आतापर्यंत ही ट्रेन देशातील 41 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू झालेली आहे.
या 41 अप आणि डाऊन मार्गांवर 82 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावत आहेत. विशेष बाब अशी की, येत्या काही महिन्यात देशातील आणखी काही महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.
यामध्ये पुणे ते शेगाव आणि मुंबई ते शेगाव या मार्गावर देखील वंदे भारत ट्रेन चालवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही वंदे भारत एक्सप्रेस उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि भुसावळ या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावरून धावणार आहेत.
तसेच या दोन्ही महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर पुणे ते शेगाव आणि मुंबई ते शेगाव यादरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला थांबा दिला जाऊ शकतो असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे.
निश्चितच रेल्वे बोर्डाने जर असा निर्णय घेतला तर उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांचा प्रवास जलद आणि गतिमान होईल अशी आशा आहे. खरे तर, विदर्भाची पंढरी म्हणून श्रीक्षेत्र शेगावची ओळख आहे.
श्री क्षेत्र शेगाव येथे संत श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो भाविक गर्दी करत असतात. मुंबई आणि पुण्याहून देखील श्रीक्षेत्र शेगाव येथे जाणाऱ्यांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे.
हेच कारण आहे की, मुंबई ते शेगाव आणि पुणे ते शेगाव या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाणार अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून समोर आली आहे.
विशेष म्हणजे या दोन्ही वंदे भारत एक्सप्रेसला जळगाव आणि भुसावळ या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा दिला जाऊ शकतो असा दावा देखील होत आहे. तथापि याबाबतचा अधिकृत निर्णय अजूनही समोर आलेला नाही.
त्यामुळे जेव्हा या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याची घोषणा होईल तेव्हाच या गाड्या उत्तर महाराष्ट्रातील या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबणार की नाही याची पुष्टी होणार आहे.