Vande Bharat Train : वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची सेमी हायस्पीड ट्रेन 2019 मध्ये सुरू झाली. तेव्हापासून आतापर्यंत देशातील 51 महत्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. आपल्या महाराष्ट्राला आतापर्यंत 8 वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे.
मात्र तुम्हाला भारतातील सर्वात वेगवान वंदे भारत एक्सप्रेस कोणती आहे याबाबत माहिती आहे का? नाही मग आज आपण देशातील सर्वाधिक वेगवान वंदे भारत एक्सप्रेस बाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या आहेत भारतातील सर्वात वेगवान वंदे भारत
नवी दिल्ली ते वाराणसी : नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर 2019 मध्ये वंदे भारत ट्रेन सुरू झाली. ही देशातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस आहे. तसेच ही सर्वात वेगवान ट्रेन असल्याचे म्हटले जात आहे. ही ट्रेन दिल्ली ते वाराणसी दरम्यानचे ७७१ किलोमीटरचे अंतर अवघ्या ८ तासात कापते. या ट्रेनचा सरासरी वेग ताशी 96.37 किलोमीटर एवढा आहे.
हजरत निजामुद्दीन ते राणी कमलापती : ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात वेगवान वंदे भारत गाडी आहे. ही गाडी या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास 7 तास 30 मिनिटांत पूर्ण करते. या ट्रेनचा सरासरी वेग ताशी 95.89 किलोमीटर एवढा आहे.
चेन्नई ते कोईम्बतूर : ही देशातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात वेगवान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन असल्याचा दावा केला जात आहे. ही ट्रेन या दोन्ही शहरादरम्यानचे 497 किलोमीटरचे अंतर फक्त पाच तास आणि 50 मिनिटात कापते. याचा सरासरी वेग ताशी 90.36 किलोमीटर एवढा आहे.
सिकंदराबाद ते विशाखापट्टणम : ही देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात वेगवान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन म्हणून ओळखली जात आहे. या गाडीचा एव्हरेज स्पीड हा ताशी 84.21 किलोमीटर एवढा आहे. ही गाडी या दोन्ही शहरादरम्यानचे 699 किलोमीटरचे अंतर अवघ्या साडेआठ तासात पूर्ण करत असल्याचा दावा केला जात आहे.
दिल्ली ते अंब अंदौरा : या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील सर्वाधिक वेगवान पाचव्या क्रमांकाची वंदे भारत ट्रेन बनली आहे. ही गाडी या दोन्ही शहरादरम्यानचे 437 किलोमीटरचे अंतर सव्वा पाच तासात पूर्ण करत आहे. या ट्रेनचा सरासरी वेग हा ताशी 84.85 किलोमीटर एवढा आहे.