Vande Bharat Train Tata Group News : आरामदायी अन गतिमान प्रवास आणि महागडे तिकीट यामुळे वंदे भारत ट्रेन सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशात चर्चेचा विषय आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरात या गाड्या सुरू करण्याचा मानस आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील नामांकित कंपन्यांमध्ये सामील असलेल्या टाटा समूहाला रेल्वे कडून वंदे भारत एक्सप्रेस निर्मितीची जबाबदारी देण्यात आली असल्याची माहिती नुकतीच काही दिवसांपूर्वी मीडिया रिपोर्ट मध्ये देण्यात आली.
देशातील नामांकित मीडिया रिपोर्ट्स मध्ये या संदर्भात माहिती समोर आली होती. मात्र आता आता टाटाने याबाबत मोठ स्पष्टीकरण दिल आहे. खरं पाहता, देशातील अग्रगण्य वृतसंस्थेने टाटा समूह येत्या वर्षात एकूण 22 वंदे भारत ट्रेनच्या कोचची निर्मिती करणार असं सांगितलं होत.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘हा’ महत्वाचा मेट्रो मार्ग प्रकल्प ‘या’ महिन्यात होणार सुरु, फडणवीसांनी थेट तारीखच सांगितली
मात्र आता टाटा ने याबाबत मोठं स्पष्टीकरण दिलं आहे. टाटा समूहाने दिलेल्या माहितीनुसार, समूह वंदे भारत कोचची निर्मिती करणार नाही. तर समूहाच्या माध्यमातून वंदे भारत एक्सप्रेस मधील सीट आणि आतील फलक म्हणजे पॅनल बनवले जाणार आहेत. भारतीय रेल्वेच्या माध्यमातून समूहाला या रेल्वेच्या आतील पॅनल आणि केवळ सीट बनविण्याची ऑर्डर प्राप्त झाली आहे.
यासाठी टाटा समूहाला 225-कोटी रुपयांचे ऑर्डर मिळाले आहे. या ऑर्डरच्या माध्यमातून टाटा कंपनी वंदे भारत ट्रेनच्या 23 कोचसाठी सीट आणि 16 डब्यांसाठी फायबर-रिइन्फोर्स्ड पॉलिमर कंपोझिट-आधारित इंटीरियर पॅनेल तयार करणार आहे.
हे पण वाचा :- केंद्रे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा; जगातील ‘या’ सर्वाधिक उंचीच्या पुलावर धावणार आता वंदे भारत एक्सप्रेस
म्हणजेच टाटा समूहाच्या माध्यमातून वंदे भारत ट्रेनच्या कोचची किंवा डब्यांची निर्मिती होणार नाही हे कंपनीच्या माध्यमातून आता स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जवळपास देशातील सर्वच वृत्तसंस्थांकडून टाटा समूहाच्या माध्यमातून वंदे भारत गाडी तयार केले जाईल, वंदे भारतच्या डब्यांची आणि कोचची निर्मिती केली जाईल असं सांगितलं जात होतं.
मात्र ही मीडियामध्ये सांगितले गेलेली माहिती ही निराधार असून टाटा समूह वंदे भारत गाड्यांसाठी केवळ सीट आणि इंटरनल पॅनलच बनवणार असल्याची मोठी माहिती टाटा स्टीलचे तंत्रज्ञान आणि नवीन साहित्य व्यवसायाचे उपाध्यक्ष देवाशिष भट्टाचार्य यांनी नवभारत टाइम्सया हिंदी वृत्तसंस्थेला दिली आहे.
हे पण वाचा :- आताची सर्वात मोठी बातमी! ‘या’ महिन्यात मिळणार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता; ‘या’ आहेत अटी, वाचा….