Vande Bharat Train : देशात गेल्या काही महिन्यांपासून वंदे भारत एक्सप्रेसची चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहे. पूर्णपणे भारतीय बनावटीची ही ट्रेन अल्पावधीतच भारतीय रेल्वेची शान बनली आहे. आरामदायी प्रवास आणि जलद गती या दोन विशेषता या ट्रेनला इतर गाड्यांच्या तुलनेत वरचढ बनवत आहेत.
सध्या स्थितीला देशभरात एकूण दहा वंदे भारत ट्रेन कार्यरत असून आपल्या महाराष्ट्रात यापैकी चार ट्रेन धावत आहेत. यामध्ये मुंबई सोलापूर अन मुंबई शिर्डी या नव्याने सामील झालेल्या वंदे भारत एक्सप्रेस चा देखील समावेश आहे. याव्यतिरिक्त आपल्या राज्यात मुंबई गांधीनगर आणि नागपूर बिलासपूर या दोन वंदे भारत ट्रेन आधीपासूनच धावत आहेत.
हे पण वाचा :- पुणेकरांसाठी आनंदवार्ता ! लवकरच मिळणार वंदे भारतची भेट; ‘या’ रूटवर धावणार, प्रवाशांचा दीड तासांचा वेळ वाचणार, पहा…..
विशेष बाब म्हणजे येत्या काही दिवसात मुंबई ते गोवा दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून नुकत्याच काही दिवसांपूर्वी समोर आली आहे. याशिवाय, पुणे-सिकंदराबाद ही वंदे भारत एक्सप्रेस देखील लवकरच सुरू होणार आहे. दरम्यान आता वंदे भारत एक्सप्रेसच्या निर्मितीबाबत एक मोठी माहिती हाती आली आहे. आता वंदे भारत एक्सप्रेस टाटा समूहाकडून तयार होणार आहे. आपल्या विश्वसनीयतेसाठी टाटा समूह संपूर्ण जगात ख्याती प्राप्त आहे.
देशात देखील टाटा समूहाचा वाहन निर्मिती आणि स्टील उद्योगात दबदबा आहे. टाटा सुमूहाला आता वंदे भारत ट्रेन बनवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यासाठी भारतीय रेल्वे आणि टाटा समूहातीलं टाटा स्टीलमध्ये करार झाला असून आता वंदे भारत ट्रेन बनवण्याचे कॉन्ट्रॅक्ट समूहाकडे आल आहे. हाती आलेल्या माहितीनुसार पुढील दोन वर्षात देशात दोनशे वंदे भारत ट्रेन धावणार आहेत. याच पार्श्वभूमीवर या ट्रेन निर्मितीला गती दिली जात आहे. विशेष म्हणजे वंदे भारत एक्सप्रेसचा विस्तार देखील जलद गतीने सुरू आहे, आता वंदे भारत स्लीपर कोच मध्ये देखील येणार आहेत.
हे पण वाचा :- म्हाडाच्या घर सोडतीसाठी अनामत रकमेत बदल; आता ‘इतकी’ अनामत रक्कम ‘या’ तारखेपर्यंत भरावी लागेल
दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांमध्ये असणारी आसन व्यवस्था ही टाटाची आहे. आता एलएचबी कोच तयार करण्याची जबाबदारीही समूहाला देण्यात आली आहे. म्हणजेच आता टाटा समूहाकडून वंदे भारत ची पॅनल खिडकी इत्यादी तयार होणार आहे. येत्या बारा महिन्यात टाटा समूहाकडून 22 वंदे भारत ट्रेन तयार केल्या जाणार आहेत. यासाठी 145 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.