Vande Bharat Train News : देशात सध्या वंदे भारत एक्सप्रेसच्या मोठ्या चर्चा रंगत आहेत. संपूर्ण स्वदेशी बनावटीची ही ट्रेन आपल्या जलद गतीसाठी आणि आरामदायी प्रवासासाठी अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस खरी उतरली आहे. यामुळे प्रवाशांना देखील ही ट्रेन हवीहवीशी वाटत आहे.
साहजिकच या ट्रेनचे तिकीट दर इतर एक्सप्रेस ट्रेन च्या तुलनेत अधिक आहेत. मात्र आरामदायी प्रवास, जलद गती यामुळे प्रवाशी अधिक तिकीट दर असतानाही वंदे भारत एक्सप्रेसनेच प्रवास करण्यास इच्छुक आहेत. या ट्रेन बाबत अधिक बोलायचं झालं तर आपल्या महाराष्ट्रात 4 वंदे भारत ट्रेन धावत आहेत.
यामध्ये मुंबई शिर्डी, मुंबई सोलापूर आणि मुंबई-गांधीनगर, नागपूर-बिलासपुर या ट्रेनचा समावेश आहे. संपूर्ण देशभरात दहा वंदे भारत ट्रेन आतापर्यंत सुरू झाल्या आहेत. आता जयपूर ते दिल्ली या दोन शहरादरम्यान देखील वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात आली आहे. जयपूर हे देशातील एक मुख्य पर्यटन स्थळ आहे, शिवाय राजस्थानची राजधानी आहे तर दिल्ली देशाची राजधानी आणि एक ग्लोबल पर्यटन स्थळ आहे. अशा परिस्थितीत या दोन मुख्य शहरांना जोडण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरू व्हावी अशी मागणी अनेकांची होती.
अखेर या रूटवर वंदे भारत ट्रेन सुरू झाली असून यामुळे मुंबई ते जयपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. मुंबई ते जयपूर बाय रोड जाणाऱ्या लोकांसाठी ही ट्रेन आनंदाची पर्वणी घेऊन आली आहे. वास्तविक दोन शहरांदरम्यान बाय रोड प्रवासासाठी सात तासांचा कालावधी खर्ची करावा लागतो.
परंतु या ट्रेनने प्रवास केल्यास हा कालावधी मात्र पावणे दोन तासांचा राहणार आहे. निश्चितच यामुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाचेल. मिळालेल्या माहितीनुसार जयपूर ते मुंबई दरम्यान वंदे भारत ट्रेन ने प्रवास करण्यासाठी चेअरकारसाठी 850 ते 950 रुपयाच तिकीट दर आहे तसेच एक्झिक्यूटिव्ह क्लाससाठी सोळाशे ते सतराशे रुपये दरम्यान तिकीट दर आहे.
कुठं राहणार थांबे
गुडगाव, रेवाडी, अलवर, बांदीकुई आणि दौसा या स्थानकांवर ही ट्रेन थांबेल. या रेल्वेचा मार्ग दिल्ली – गुडगाव – रेवाडी – अलवर – बांदिकुई – दौसा – जयपूर असा आहे.