Vande Bharat Train In Maharashtra : सध्या महाराष्ट्रात एका गोष्टीची विशेष चर्चा होत आहे. ती म्हणजे वंदे भारत ट्रेनची आणि तिच्या उद्घाटन सोहळ्याची. खरं पाहता दहा फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राला एकूण दोन वंदे भारत एक्सप्रेसची सौगात केंद्राकडून मिळणार आहे. या दोन वंदे भारत ट्रेन मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी दरम्यान धावणार आहेत. यामुळे मायानगरी मुंबईहून पुणे, सोलापूर आणि शिर्डीकडचा प्रवास सोयीचा होणार आहे.
दरम्यान आता या वंदे भारत एक्सप्रेसच्या बाबत एक मोठी माहिती आहे. जसे की आपणास ठाऊकच आहे वंदे भारत ट्रेन ही पूर्णपणे स्वदेशी बनावटीची आहे. ही ट्रेन सोनीपत आणि रायबरेली या ठिकाणी तयार केली जाते. दरम्यान आता ही ट्रेन महाराष्ट्रात देखील तयार केली जाणार आहे. यासाठी रेल्वे विभागाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील लातूर या ठिकाणी वंदे भारत ट्रेन आता विकसित केली जाणार आहे.
विशेष बाब अशी की, याबाबतचे प्रोडक्शन आणि डिझाईन संपूर्णपणे तयार करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, लातूर जिल्ह्यातील रेल्वे कोच फॅक्ट्रीमध्ये हे काम करण्यात येणार आहे. यामुळे याचा मोठा फायदा महाराष्ट्राला होणार असून यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. राज्यातील मराठी तरुणांना या निमित्तानं रोजगार मिळणार असल्याची माहिती रेल्वे विभागानं सुद्धा दिली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, वंदे भारत ट्रेन 110 कोटी रुपये खर्च करून बनवली गेली आहे. या ट्रेनमध्ये अशी टेक्नॉलॉजी बसवण्यात आली आहे ज्यामुळे एकाच ट्रॅकवर दोन ट्रेन समोरासमोर आल्यात तर तीन किलोमीटर पूर्वीचं या ट्रेनचे ब्रेक लावले जातात.
याला कवच’ तंत्रज्ञान (ट्रेन कोलिजन अव्हॉइडन्स सिस्टीम) असं नाव देऊन संबोधले जात आहे. ही एक स्वयंचलित म्हणजेच ऑटोमॅटिक सुरक्षा प्रणाली असून ही प्रणाली दोन गाड्यांची टक्कर होण्यापासून रोखण्यास मदत करणारी आहे. विशेष म्हणजे ही टेक्नॉलॉजी संपूर्णपणे स्वदेशी आहे.