Vande Bharat Train Latest News : सध्या वंदे भारत एक्सप्रेसला देशातील काही महत्त्वाच्या मार्गावर सुरू करण्याचा सपाटा सुरू आहे. या चालू एप्रिल महिन्यात देशात आतापर्यंत चार वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला असून 25 एप्रिलला आणखी एक गाडी सुरू होणार आहे.
25 एप्रिल 2023 रोजी केरळ येथील त्रिवेंद्रम ते कासारगोड दरम्यान पंधरावी वंदे भारत ट्रेन सुरू केले जाणार आहे. केरळ मधील मात्र ही पहिलीच वंदे भारत गाडी राहणार आहे. त्यामुळे केरळवासीयांमध्ये या ट्रेन बाबत मोठी उत्सुकता आहे. दरम्यान या ट्रेनची संख्या झपाट्याने वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
हे पण वाचा :- मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस बाबत मोठी अपडेट ! ही Vande Bharat ट्रेन….
याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून लातूर येथील रेल्वे कोच फॅक्टरी मध्ये 120 नवीन वंदे भारत ट्रेन तयार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ऑगस्ट महिन्यापासून प्रत्यक्षात या कोच फॅक्टरी मध्ये याचे काम सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रविवारी या कोच फॅक्टरीची पाहणी केली आहे.
फॅक्टरी मध्ये उपस्थित अधिकाऱ्यांकडून या संदर्भात त्यांनी माहिती देखील जाणून घेतली आहे. वास्तविक केंद्र शासनाने येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत 75 वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचे लक्ष ठेवले आहे. तसेच नरेंद्र मोदी यांनी एका सभेत देशात एकूण 400 वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सुरू होतील अशी घोषणा केली आहे.
हे पण वाचा :- वंदे भारत एक्सप्रेस बाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची मोठी माहिती; म्हटले की, ऑगस्टमध्ये महाराष्ट्रात…..
या अनुषंगाने भारतीय रेल्वेला आदेश देण्यात आले असून रेल्वेच्या माध्यमातून देशातील महत्त्वाच्या मार्गावर ही ट्रेन सुरू केली जात आहे. आतापर्यंत 14 वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्या असून 25 एप्रिलला पंधरावी गाडी सुरू होणार आहे. विशेष म्हणजे ऑगस्टनंतरही देशातील वेगवेगळ्या मार्गावर ही गाडी सुरू होणार आहे.
यामुळे या ट्रेनच्या निर्मितीला चालना दिली जात आहे. आपल्या महाराष्ट्राला देखील आगामी काही महिन्यात आणखी काही वंदे भारतची भेट मिळणार आहे. यामध्ये मुंबई ते मडगाव, मुंबई ते उदयपूर पुणे ते सिकंदराबाद यादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा मानस शासनाचा आहे.
हे पण वाचा :- मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला ‘या’ गावात थांबा मिळणार? पहा काय म्हणाले रेल्वे अधिकारी