Vande Bharat Train Latest News : वंदे भारत एक्सप्रेस ही ट्रेन 2019 मध्ये सुरू करण्यात आली. पहिली ट्रेन दिल्ली ते वाराणसी या रूटवर सुरू झाली. यानंतर या गाडीला प्रवाशांनी मोठी पसंती दाखवली. तब्बल 180 किलोमीटर प्रतितास वेगाने धावण्यास सक्षम असलेल्या या ट्रेनमुळे रेल्वे प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाचू लागला. शिवाय ही ट्रेन आरामदायी प्रवास देण्यास सक्षम ठरली. परिणामी अवघ्या काही वर्षांच्या काळातच या ट्रेनने शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेसला धोबीपछाड दिली.
गतीमध्ये ही ट्रेन शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेस पेक्षा सरस आहे. शिवाय या ट्रेनचा प्रवास हा इतर एक्सप्रेस ट्रेन च्या तुलनेत खूपच आरामदायी आहे. या ट्रेनमध्ये रेल्वे प्रवाशांना वर्ल्डक्लास फॅसिलिटीज उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यामुळे ही ट्रेन आता देशातील वेगवेगळ्या मार्गावर सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आतापर्यंत देशात एकूण 14 वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्या आहेत.
हे पण वाचा :- पुणे, मुंबई, कोल्हापूरवासियांसाठी आनंदाची बातमी ! ‘ही’ एक्सप्रेस ट्रेन लवकरच होणार सुरु, रेल्वे प्रवाशांना मिळणार दिलासा, पहा…
यापैकी चार वंदे भारत एक्सप्रेसचा महाराष्ट्राला फायदा लाभत आहे. राज्यातुन मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते शिर्डी आणि नागपूर ते बिलासपुर या मार्गावर सध्या वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे. दरम्यान महाराष्ट्राला आणखी काही वंदे भारतची भेट मिळणार आहे. एका मीडिया रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, 15 ऑगस्टपर्यंत देशभरात एकूण 75 वंदे भारत एक्सप्रेस नव्याने सुरू होणार आहेत.
त्यामध्ये येत्या काही दिवसात 30 वंदे भारत एक्सप्रेस सुरू होतील अशी माहिती हाती आली आहे. दरम्यान या चालू एप्रिल महिन्यात आत्तापर्यंत चार वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्या असून या महिन्याच्या अखेरपर्यंत आणखी दोन वंदे भारत एक्सप्रेस सुरू होऊ शकतात अशी शक्यता आहे. नई दुनिया या हिंदी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 24 एप्रिल 2023 रोजी म्हणजेच येत्या सोमवारी रीवा ते इंदोर या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू होणार असून या गाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी खुशखबर ! शिंदे सरकारने लोकलबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय, आता Mumbai Local चा प्रवास होणार सुसाट, पहा…..
याबाबत अधिकृत माहिती हाती आलेली नसली तरी देखील या मीडिया रिपोर्ट मध्ये असा दावा करण्यात आला आहे. याशिवाय, रेल्वेमंत्र्यांनी 25 एप्रिल 2023 रोजी केरळला पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस ची भेट देण्याची घोषणा केली आहे. त्रिवेंद्रम ते कासारगोड दरम्यान ही वंदे भारत ट्रेन धावणार असून या गाडीला नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
यामुळे जर 24 एप्रिलला देखील रीवा ते दरम्यान वंदे भारत सुरू झाली तर एप्रिल महिन्यात एकूण सहा वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहेत. अशा परिस्थितीत आता येत्या सोमवारी या मार्गावर ट्रेन सुरू होते का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. मात्र 25 एप्रिल ला त्रिवेंद्रम ते कासारगोड या केरळ मधील पहिल्या वंदे भारत ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी कडून हिरवा झेंडा दाखवण्याचे नक्की झाले आहे.