Vande Bharat Train Indian Railway : वंदे भारत एक्सप्रेस ही आपल्या गतिमान, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी कमी दिवसातच विशेष लोकप्रिय ठरली आहे. यासोबतच या ट्रेन बाबत वेगवेगळ्या चर्चा देखील रंगत आहेत. विशेषता या ट्रेनचे अधिक तिकीट असल्याने ही ट्रेन मध्यमवर्गीयांसाठी आणि गरिबांसाठी नसल्याचा आरोप होतो.
तसेच या ट्रेन वर होणारी दगडफेक देखील ही ट्रेन कायमच चर्चेत राहण्याचे प्रमुख कारण आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की सध्या देशभरात एकूण दहा मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू आहेत. शिवाय एक एप्रिल 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करकमलाद्वारे नवी दिल्ली ते भोपाळ दरम्यान अकरावी वंदे भारत गाडी सुरू केली जाणार आहे.
सध्या स्थितीला महाराष्ट्रात चार वंदे भारत गाड्या सुरू असून आगामी काही महिन्यात आणखी दोन वंदे भारत एक्सप्रेस महाराष्ट्राला मिळणार आहेत. यात पुणे ते सिकंदराबाद आणि मुंबई ते गोवा या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा मानस रेल्वेचा आहे. मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेस बाबत नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मोठी माहिती देखील दिली आहे.
हे पण वाचा :- 10वी पास तरुणांसाठी आनंदवार्ता! आरबीआय मध्ये ‘या’ पदासाठी निघाली मोठी भरती; पहा भरतीची संपूर्ण माहिती
त्यांनी ही ट्रेन लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत दिले आहेत. निश्चितच हि ट्रेन जलद प्रवासासाठी ओळखली जात असली तरी देखील या ट्रेन वर होणारी दगडफेक हा एक चिंतेचा विषय आहे. दरम्यान आता भारतीय रेल्वेच्या माध्यमातून या संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. वास्तविक वंदे भारत एक्सप्रेस वर होणारी दगडफेक रोखण्यासाठी रेल्वेच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत.
नुकतेच दक्षिण मध्ये रेल्वेने या ट्रेनवर दगडफेक करू नये, अशा घटनांमध्ये सहभागी होऊ नये असे आवाहन लोकांना केले आहे. तसेच दगडफेक करणाऱ्या आणि अशा घटनांमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांना पाच वर्षाच्या जेलची शिक्षा भोगावी लागेल असा इशारा देखील यावेळी रेल्वेच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे वंदे भारत एक्सप्रेस ही मेक इन इंडिया अंतर्गत तयार करण्यात आलेली संपूर्ण भारतीय बनावटीची ट्रेन फेब्रुवारी 2019 मध्ये भारतात सुरू करण्यात आली. मात्र ही ट्रेन सुरू झाल्यापासूनच काही समाजकंटकांच्या माध्यमातून तेलंगणा, बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमध्ये तिला टार्गेट करण्यात आलं आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी खुशखबर ! कोस्टल रोड ‘या’ महिन्यात सुरू होणार; महापालिका आयुक्तांनी थेट तारीखच सांगितली
या अशा घटना रोखण्यासाठी मात्र रेल्वेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी काही मोहिमा चालवल्या जात आहेत. ज्या ठिकाणी दगडफेक अधिक होतात त्या ठिकाणी कर्मचारी तैनात करण्याचे नियोजन रेल्वेचे आहे. तसेच ट्रेनवर दगडफेक करणे हा फौजदारी गुन्हा आहे आणि रेल्वे कायद्याच्या कलम 153 नुसार दोषींवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
याबाबत दक्षिण मध्य रेल्वेच्या माध्यमातून प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आल आहे. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, दगडफेक करणाऱ्या आणि अशा घटनांमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल आणि गुन्हेगारांना तब्बल 5 वर्षांपर्यंत शिक्षाही दिली जाऊ शकते.
निश्चितच वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेचा चेहरा मोहरा बदलण्याची कुवत ठेवणारी ट्रेन आहे. या ट्रेनमुळे रेल्वेचा प्रवास जलद झाला आहे, यामुळे ही ट्रेन अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीच खरी उतरली आहे. मात्र या ट्रेन वर होणारी दगडफेक चिंतेचा विषय असून यासाठी रेल्वेच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम सुरू आहे.
हे पण वाचा :- अखेर निर्णय झालाच! 1 एप्रिलला ‘या’ दोन शहरादरम्यान सूरू होणार 11वी वंदे भारत ट्रेन; पहा संपूर्ण रूटमॅप