Vande Bharat Train : देशात या चालू वर्षी एकूण नऊ राज्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. शिवाय पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. अशा परिस्थितीत देशात विकास कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. अशातच महाराष्ट्राला नुकत्याच दोन वंदे भारत ट्रेनची भेट केंद्र शासनाच्या माध्यमातून मध्य रेल्वेने दिली आहे.
मुंबई सोलापूर आणि मुंबई शिर्डी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ला 10 फेब्रुवारी रोजी दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. यापैकी मुंबई सोलापूर वंदे भारत ट्रेन पुणे मार्गे धावते. त्यामुळे पुणेकरांची गेल्या अनेक महिन्यांची वंदे भारत ट्रेनची मागणी पूर्ण झाली आहे. विशेष बाब म्हणजे पुणेकरांना अजून एक गोड बातमी रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे विभाग देशात लवकरच आणखी तीन वंदे भारत ट्रेन सुरू करणार आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो देशात आतापर्यंत 10 वंदे भारत ट्रेन सुरू झाले आहेत यापैकी चार वंदे भारत ट्रेन एकट्या महाराष्ट्रात आहेत. विशेष बाब म्हणजे यापैकी दोन वंदे भारत मुंबई सोलापूर आणि मुंबई शिर्डी या इंटरस्टेट वंदे भारत ट्रेन आहेत. इंटरस्टेट वंदे भारत ट्रेन असणारे महाराष्ट्र हे एक मात्र राज्य आहे.
दरम्यान आता पुणेकरांना लवकरच एक वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार असून ही वंदे भारत ट्रेन महाराष्ट्रात धावणारी पाचवी वंदे भारत ट्रेन राहणार आहे. मात्र ही वंदे भारत ट्रेन इंटरास्टेट राहणार आहे. दक्षिण रेल्वे विभागाच्या माध्यमातून देशाभरात नवीन तीन वंदे भारत एक्सप्रेस सुरु केल्या जाणार आहेत. यामध्ये सिकंदराबाद-पुणे या वंदे भारत एक्सप्रेस चा देखील समावेश राहणार आहे.
विशेष म्हणजे ही ट्रेन सोलापूर मार्गे धावणार आहे यामुळे याचा पुणेकरांसोबतच सोलापूर वासियांना देखील मोठा फायदा होणार आहे. या ट्रेनमुळे पुणेकरांचा हैदराबाद कडील प्रवास सोयीचा होणार आहे तसेच सोलापूरवासियांचा देखील पुणे आणि हैदराबादचा प्रवास सोयीचा होणार आहे.
मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिकंदराबाद-पुणे वंदे भारत एक्सप्रेस सोबतच सिकंदराबाद-तिरुपती आणि सिकंदराबाद-बेंगलोर या तीन वंदे भारत ट्रेन सुरू केल्या जाणार आहेत. अधिकाऱ्यांनी नुकतीच याबाबतची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या रेल्वे कधी सुरू होतील याबाबत लवकरच तारखांची घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे पुणेकरांचे या तारखांकडे विशेष लक्ष लागून राहणार आहे.