Vande Bharat Train : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई तसेच सांस्कृतिक राजधानी पुणे येथील नागरिकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मुंबई आणि पुण्याला आणखी एका वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे.
मुंबईहून एक आणि पुण्याहून एक अशा दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहेत. यामुळे महाराष्ट्रातील वंदे भारत एक्सप्रेसची संख्या लवकरच 8 वर जाणार असे चित्र तयार होत आहे.
खरंतर, ही गाडी 2019 मध्ये सर्वप्रथम नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवण्यात आली होती. तेव्हापासून आत्तापर्यंत देशातील एकूण 34 महत्त्वाच्या मार्गावर या गाडीच्या संचालन सुरू झाले आहे. या 34 पैकी सहा मार्ग आपल्या महाराष्ट्रातून जात आहेत. म्हणजेच आत्तापर्यंत राज्याला सहा वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे.
राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, नागपूर ते बिलासपुर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव आणि इंदोर ते नागपूर या सहा मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू आहे. विशेष म्हणजे आता मुंबई ते अहमदाबाद आणि वडोदरा ते पुणे दरम्यान वंदे भारत ट्रेन चालवली जाईल असे वृत्त समोर आले आहे.
मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद दरम्यान नवीन वंदे भारत का ?
वास्तविक, सध्या राजधानी मुंबई येथील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे. या गाडीला रेल्वे प्रवाशांनी भरभरून असा प्रतिसाद दिला आहे. ही गाडी अहमदाबाद मार्गे धावत आहे.
या गाडीला अहमदाबाद येथे थांबा देखील मिळालेला आहे. मग तरीही मुंबई ते अहमदाबाद दरम्यान नवीन वंदे भारत एक्सप्रेस का चालवली जाते हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की या मार्गावर प्रवासी संख्या खूप अधिक आहे.
या ट्रेनची ॲक्युपसी 135 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. या गाडीच्या प्रत्येक ट्रीपला वेटिंग लिस्ट असतेच. हेच कारण आहे की मुंबई ते अहमदाबाद दरम्यान नवीन वंदे भारत ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विशेष बाब अशी की मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद दरम्यानच्या या वंदे भारत एक्सप्रेसची ट्रायल रन देखील सुरू झाली आहे. मात्र या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा अंतिम निर्णय रेल्वे बोर्डच घेणार आहे. सध्या या मार्गावर या गाडीच्या ट्रायल रन सुरू आहेत. या ट्रायल रन पूर्ण झाल्यानंतर ही गाडी चालवण्याबाबत रेल्वे बोर्डाकडून निर्णय घेतला जाणार आहे.
वडोदरा ते पुणे वंदे भारत केव्हा धावणार
पुणे ते वडोदरा दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार अशी बातमी समोर आली आहे. परंतु या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी केव्हा सुरू होईल याबाबत अद्याप कोणतीच माहिती आता आलेली नाही.
यामुळे वडोदरा ते पुणे ही गाडी केव्हा द्यावेल याबाबत आत्ताच सांगणे थोडे कठीण आहे. तथापि लवकरच या मार्गावर देखील ट्रायल रन होईल आणि पुणे ते वडोदरा हा प्रवास लवकरच वंदे भारत एक्सप्रेसने करता येईल अशी अशा जाणकार लोकांनी यावेळी व्यक्त केली आहे.