Vande Bharat Train : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली सेमी हायस्पीड ट्रेन आहे. ही गाडी सर्वप्रथम 2019 मध्ये सुरु झाली. पहिल्यांदा ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली. यानंतर, टप्प्याटप्प्याने देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू झाले.
सध्या ही गाडी देशातील 65 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू आहे. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्यातील 11 मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू आहे. महाराष्ट्रातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते मडगाव, पुणे ते कोल्हापूर, पुणे ते हुबळी, नागपूर ते बिलासपुर, नागपूर ते इंदोर आणि नागपूर ते सिकंदराबाद या मार्गावर ही गाडी सुरू आहे.
मात्र या गाडीबाबत सर्वसामान्यांच्या मनात अजूनही अनेक प्रश्न उपस्थित होतायेत. अनेकांना या गाडीने वेटिंग तिकीट घेऊन प्रवास करता येणार का असा प्रश्न पडलाय. दरम्यान आज आपण याच संदर्भात माहिती पाहणार आहोत. खरे तर वंदे भारत ट्रेनचे तिकीट सणासुदीच्या काळात मिळणे अनेकदा अवघड होते.
अनेकांना याचे कन्फर्म तिकीट मिळत नाही. वंदे भारत ट्रेनची तिकिटे इतर गाड्यांपेक्षा महाग आहेत. मात्र असे असले तरी दिवाळीच्या काळात या गाडीची वेटिंग लिस्ट म्हणजेच प्रतीक्षा यादी अधिक होत आहे. सध्या वंदे भारतमधील वेटिंग तिकिटांच्या कन्फर्मेशनची वाट पाहणारे बरेच लोक आहेत.
यामुळे अनेकांना वंदे भारत एक्सप्रेस ने वेटिंग तिकीट घेऊन प्रवास करता येऊ शकतो का हा प्रश्न पडलाय. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की वंदे भारत एक्सप्रेस च्या नियमानुसार जर तुमचे तिकीट वेटिंगमध्ये असेल तर तुम्हाला वंदे फार ट्रेनने प्रवास करता येणार नाही. खरंतर तुमचे तिकीट वेटिंग मध्ये आहे याचा अर्थ तुमच्याकडे ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी सीट उपलब्ध नाही.
कारण की, प्रतीक्षा यादीतील तिकीट असलेल्या प्रवाशांना कोणताही आसन क्रमांक मिळत नाही. तुम्ही वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवास करत असाल किंवा इतर कोणत्याही ट्रेनमध्ये, वेटिंग लिस्ट केलेले तिकीट घेऊन प्रवास करत असाल तर रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन मानले जाते. कारण प्रवाशांचे वेटिंग तिकीट कन्फर्म झाले नाही तर त्यांना त्यांचे पैसे परत मिळतात.
अशा परिस्थितीत तुम्ही जर वेटिंग तिकीट आहे म्हणून वंदे भारत एक्सप्रेस ने किंवा कोणत्याही एक्सप्रेसने प्रवास करत असाल तर याचा अर्थ असा आहे की, तुम्ही कोणत्याही सीटशिवाय प्रवास करताय. यामुळे तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. इतर प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून हे नियम करण्यात आले आहेत. वेटिंग तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून पाचशे रुपयांपर्यंत दंड घेतला जाऊ शकतो. विशेष म्हणजे जर अंतर जास्त असेल तर दंडाची रक्कम याहीपेक्षा अधिक राहू शकते.