Vande Bharat Train : सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशात वंदे भारत एक्सप्रेस विषयी मोठी क्रेज पाहायला मिळत आहे. रेल्वे प्रवाशांनी या ट्रेनने प्रवास करण्यास अधिक पसंती दर्शवली आहे. यामुळे गदगद झालेल्या रेल्वे विभागाकडून आता ही ट्रेन देशातील वेगवेगळ्या महत्त्वाच्या मार्गावर सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून आज देशाला सोळावी वंदे भारत एक्सप्रेस मिळाली आहे. केरळ येथील त्रिवेंद्रम ते कासारगोडदरम्यान आज वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला आहे. अशातच आता बिहार ते झारखंड या राज्यांना देखील वंदे भारत एक्सप्रेसची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
हे पण वाचा :- मुंबई ते पुण्याचा प्रवास होणार सुसाट ! ‘या’ ठिकाणी तयार होणार नवीन मार्ग; MMRDA चा प्लॅन काय?
याची घोषणा भारतीय रेल्वेच्या माध्यमातून नुकत्याच काही दिवसांपूर्वी झाली आहे. बिहारची राजधानी पटना ते झारखंडची राजधानी रांची यादरम्यान नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. निश्चितच यामुळे पटना ते रांची दरम्यानचा प्रवास सोयीचा होणार आहे. प्रवाशांना जलद आणि आरामदायी प्रवास Vande Bharat Express मुळे मिळणार आहे.
मीडिया रिपोर्ट मध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, या वंदे भारत ट्रेनने पटना ते रांचीचा प्रवास फक्त सहा तासात करता येणे शक्य होणार आहे. यामुळे प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाचणार आहे. यादेखील गाडीला इतर वंदे भारत एक्सप्रेसप्रमाणेच पसंती मिळण्याची आशा रेल्वेला आहे.
हे पण वाचा :- आज देशाला मिळणार 15वी वंदे भारत एक्सप्रेस; ट्रेनच्या रूटची माहिती, अन वेळापत्रक कसं राहणार? वाचा
कसा असेल रूट?
एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार, पटना ते रांची ही वंदे भारत ट्रेन नवीन मार्गाने चालवली जाणार आहे. सध्या चालू असलेली शताब्दी एक्सप्रेस बोकारो मुरी मार्गे गया ते हजारीबाग मार्गे रांचीला पोहोचते. मात्र नवीन वंदे भारत ट्रेन जहानाबाद, गया, कोडरमा, हजारीबाग टाउन, बरकाकाना, तातीसिल्वे आणि रांची मार्गे रांची रेल्वे स्टेशनला पोहोचणार आहे.
त्यामुळे प्रवासाचा वेळ सुमारे दोन तासांनी कमी होण्याची आशा जाणकारांनी व्यक्त केली आहे. म्हणजे आता प्रवाशांना पटण्याहून रांचीला अवघ्या सहा तासांत पोहोचता येणार आहे. एकंदरीत हा रूट आणि वंदे भारत ट्रेन पटना ते रांची दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी भेट राहणार आहे. यामुळे प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाचण्यास मदत होणार आहे.