Vande Bharat Train : देशात सध्या वंदे भारत एक्सप्रेसची मोठी क्रेज पाहायला मिळत आहे. जलद आणि आरामदायी प्रवासासाठी ओळखली जाणारी ही ट्रेन गेल्या दोन-तीन वर्षांच्या काळातच रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या पसंतीस खरी उतरली आहे. आतापर्यंत संपूर्ण देशात एकूण दहा वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. यापैकी महाराष्ट्रात चार वंदे भारत एक्सप्रेस कार्यरत आहेत. विशेष म्हणजे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी लवकरच मुंबई ते गोवा दरम्यान ही संपूर्ण स्वदेशी बनावटीची ट्रेन धावेल अशी माहिती गेल्या काही दिवसांपूर्वी दिली आहे.
यासोबतच रेल्वे बोर्ड कडून पुणे सिकंदराबाद या रूट वर देखील वंदे भारत ट्रेन चालवली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत रेल्वे बोर्डाकडून संकेतही देण्यात आले आहेत. सध्या स्थितीला पुणे सिकंदराबाद या रूट वर धावणारी शताब्दी एक्सप्रेस बंद आहे. यामुळे आता शताब्दी ऐवजी थेट वंदे भारत ट्रेनचं या रूटवर धावेल असा अंदाज बांधला जात आहे.
म्हणजेच आगामी काही दिवसात महाराष्ट्रात एकूण सहा वंदे भारत ट्रेन कार्यरत होतील अशी शक्यता या निमित्ताने व्यक्त होत आहे. निश्चितच वंदे भारत एक्सप्रेस मुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जलद प्रवासाचा अनुभव येत आहे. शिवाय सुरक्षित अन आरामदायी प्रवास असल्याने देशात वेगवेगळ्या रूटवर ही ट्रेन सुरू करण्याची मागणी आहे. भारतीय रेल्वेकडून देखील येत्या दोन ते तीन वर्षात चारशे वंदे भारत ट्रेन संपूर्ण देशभर चालवण्याचं नियोजन आखण्यात आल आहे.
विशेष म्हणजे यामध्ये स्लीपर कोच वंदे भारत एक्सप्रेस तसेच वंदे भारत मेट्रोचा देखील समावेश राहणार आहे. दरम्यान आता नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस बाबत मोठे अपडेट हाती आली आहे. खरं पाहता आत्तापर्यंत या रूट वर धावणारी वंदे भारत आठवड्याच्या पाचच दिवस धावत होती. मात्र आता ही ट्रेन आठवड्याच्या सहा दिवस धावणार आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांना लवकरच मिळणार मोठ गिफ्ट! मुख्यमंत्री शिंदे ‘या’ बहुचर्चित उड्डाणपुलाचे गुढीपाडव्याला करणार उद्घाटन, वाचा सविस्तर
यामुळे नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना निश्चितच दिलासा मिळणार आहे. सोमवार अर्थातच 20 मार्च 2023 पासून गुरुवार वगळता हफ्त्याच्या सहा दिवस ही गाडी चालवली जाणार आहे. ही ट्रेन फेब्रुवारी 2019 मध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात आली. अल्पावधीतच या ट्रेनला प्रवाशांनी चांगली पसंती दाखवली. गेल्या चार वर्षांपासून मात्र ही ट्रेन आठवड्यातून केवळ पाच दिवस धावत आहे.
मात्र आता रविवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि सोमवारी पण हे ट्रेन धावणार आहे. आतापर्यंतही ट्रेन रविवार मंगळवार बुधवार शुक्रवार आणि शनिवारिच सुरु असायची. सोमवारपासून ही ट्रेन मात्र सोमवारी देखील धावणार आहे. निश्चितच या निर्णयामुळे नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.