Vande Bharat Train 2023 : देशातील पहिल्या हायस्पीड ट्रेन बाबत अर्थातच वंदे भारत ट्रेन बाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी वंदे भारत एक्सप्रेस बाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी घोषणा केली आहे. खरंतर, 2019 मध्ये ही गाडी सर्वप्रथम रुळावर धावली होती.
तेव्हापासून आत्तापर्यंत देशातील एकूण 34 महत्त्वाच्या मार्गावरील रुळावर ही गाडी सुसाट सुरू आहे. या 34 महत्त्वाच्या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. रेल्वे प्रवाशांचा प्रवास या गाडीमुळे जलद आणि सुरक्षित झाला आहे. तथापि, या गाडीचे तिकीट दर इतर एक्सप्रेस गाडींच्या तुलनेत अधिक असल्याने सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांच्या माध्यमातून या गाडीवर टीका देखील केली जात आहे.
ही गाडी फक्त उच्चवर्गीय लोकांसाठी सुरू झाली आहे असा आरोप सर्वसामान्यांकडून होत आहेत. मात्र, ही फक्त नाण्याची एक बाजू आहे. कारण की या गाडीला रेल्वे प्रवाशांनी तिकिटाचे दर अधिक असतानाही मोठ्या प्रमाणात पसंती दाखवली आहे. हेच कारण आहे की, भारतीय रेल्वेच्या माध्यमातून ही गाडी देशातील जवळपास सर्वच महत्त्वाच्या मार्गावर सुरू करण्याचे नियोजन आखले जात आहे.
दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आता काश्मीर पर्यंत चालवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या चालू वर्षातच ही गाडी काश्मीरच्या रुळांवर धावणार आहे. दस्तूरखुद्द केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीच ही गाडी काश्मीरमधील श्रीनगर पर्यंत धावणार असल्याची मोठी घोषणा केली आहे.
पीटीआय वृत्तसंस्थेला त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जम्मू ते श्रीनगर या रेल्वे मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असून हा मार्ग तयार झाला की लगेचच यावर वंदे भारत ट्रेन चालवली जाईल असे सांगितले आहे. मंत्री महोदय यांनी वंदे भारत एक्सप्रेस ही सर्व प्रकारच्या हवामानात, तापमानात आणि वातावरणात चालतील अशा गाडी असल्याचे सांगितले असून लवकरच ही गाडी काश्मीरमध्येही धावणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
विशेष म्हणजे यंदाच्या आर्थिक वर्षातच ही गाडी काश्मीरमध्ये चालवण्यास सरकार कटीबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या चालू वर्षात जम्मू ते श्रीनगर या रेल्वेमार्गाचे उद्घाटन होईल आणि त्यानंतर ही गाडी सुरू केली जाईल अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या माध्यमातून समोर आली आहे. तसेच रेल्वेमंत्र्यांनी मार्च 2024 पर्यंत 75 वंदे भारत ट्रेन सुरू करणार असल्याचे सांगितले आहे.
निश्चितच, जम्मू ते श्रीनगर हा रेल्वे मार्ग सुरू झाला आणि या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू झाली तर तेथील रेल्वे प्रवाशांना याचा मोठा फायदा मिळणार आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे दिल्ली ते श्रीनगर पर्यंत वंदे भारत ट्रेनने प्रवास करता येणे शक्य होणार आहे. कारण की, सध्या स्थितीला दिल्ली ते कटरा दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे.