Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत एक्सप्रेसनंतर आता भारतीय रेल्वेच्या माध्यमातून लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू केली जाणार आहे. ही स्लीपर ट्रेन लांब पल्ल्याच्या मार्गावर चालवली जाणार आहे. मुंबई आणि पुण्याला देखील वंदे भारत स्लीपर ट्रेनची भेट मिळणार असे रेल्वेने म्हटले आहे.
दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मध्य प्रदेशला लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेनची भेट मिळणार आहे.
स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस डिसेंबरमध्ये राजधानी भोपाळच्या RKMP रेल्वे स्थानकावरून सुरू होणार अशी माहिती समोर येत आहे. या गाडीचा रॅकही वाटप करण्यात आला असून लवकरच तो भोपाळला पोहोचणार आहे.
स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस आरकेएमपी स्टेशनवरून पाटलीपुत्रला जाईल. सध्या ही ट्रेन आठवड्यातून फक्त 2 दिवस धावणार आहे. राणी कमलापती रेल्वे स्टेशन (RKMP) ते पाटलीपुत्र (पाटणा) पर्यंत धावणारी ही वंदे भारत एक्सप्रेस भोपाळ रेल्वे विभागाची ट्रेन राहणार आहे.
भोपाळहून धावणाऱ्या स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. आता याबाबतचे ताजे अपडेट समोर आले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरकेएमपी-पाटलीपुत्र स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे.
भोपाळचे डीआरएम कमर्शियल सौरभ कटारिया म्हणालेत की, आरकेएमपी-पाटलीपुत्र वंदे भारत आठवड्यातून दोन दिवस चालेल ज्यासाठी सध्या एक रेक वाटप करण्यात आला आहे. स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसचा रेक सुमारे 20 डब्यांचा असेल.
नवीन वंदे भारत एक्स्प्रेसचा हा रेक नोव्हेंबरच्या अखेरीस भोपाळला पोहोचणार आहे. RKMP-पाटलीपुत्र स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ही भोपाळ रेल्वे विभागाची ट्रेन असेल. वंदे भारत स्लीपर ट्रेन RKMP येथून संध्याकाळी 5 च्या सुमारास सुटेल असे सांगण्यात येत आहे.
ही ट्रेन दुसऱ्या दिवशी सकाळी 11 च्या सुमारास पाटलीपुत्रला पोहोचेल. अशाप्रकारे, स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस RKMP स्टेशन ते पाटलीपुत्र स्थानकापर्यंतचे 1005 किमीचे अंतर सुमारे 18 तासांत पूर्ण करेल.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस पाटलीपुत्रापर्यंत पोहोचेल जी पाटण्यापासून आरकेएमपीहून इतर कोणत्याही ट्रेनपेक्षा अधिक वेगाने जाईल. इतर गाड्यांच्या तुलनेत स्लीपर वंदे भारतला दीड ते दोन तास कमी वेळ लागेल.