Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत एक्सप्रेसच्या अभूतपूर्व यशानंतर आता वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू केली जाणार आहे. पुढल्या महिन्यात म्हणजेच ऑगस्ट महिन्यात ही गाडी लॉन्च होणार असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जातोय. मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर देशातील पहिली वंदे भारत स्लीपर राजधानी मुंबईला मिळणार आहे.
मुंबई ते सिकंदराबाद या मार्गावर ही गाडी सुरू होण्याची शक्यता. मुंबई ते सिकंदराबाद हा एक व्यस्त मार्ग असून या मार्गावर स्लीपर ट्रेन सुरू केल्यास रेल्वेला याचा फायदा होणार आहे. यामुळे मुंबई ते सिकंदराबाद या दरम्यानचा प्रवास वेगवान होणार अशी आशा आहे.
दुसरीकडे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने नागपूर ते पुणे या मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवण्याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे.
यामुळे जर या प्रस्तावावर रेल्वे बोर्डाने सकारात्मक निर्णय घेतला तर नागपूर ते पुणे या मार्गावर देखील ही गाडी धावू शकणार आहे. अशातच आता वंदे भारत स्लीपर ट्रेन संदर्भात एक नवीन आणि आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.
गोरखपूर ते आग्रा दरम्यान ही Vande Bharat Sleeper Train सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे या दोन्ही शहरा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असे बोलले जात आहे.
गोरखपूर ते आग्रा किल्ल्यापर्यंत स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असून जानेवारी 2025 पासून रेल्वेच्या वेळापत्रकात ही ट्रेन समाविष्ट केली जाणार असल्याची बातमी एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.
या नवीन रेल्वे सेवेमुळे दोन शहरांमधील प्रवास अवघ्या 10 तासांत पूर्ण होणार असून, प्रवासाचा वेळ पूर्वीपेक्षा खूपच कमी होणार आहे. ईशान्य रेल्वेने (NER) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सविस्तर प्रस्ताव तयार केला आहे.
या प्रस्तावानुसार, स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. दरम्यान आता आपण या प्रस्तावित स्लीपर वंदे भारत ट्रेनचे वेळापत्रक नेमके कसे राहणार हे थोडक्यात समजून घेणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक
रेल्वे बोर्डाकडे सादर झालेल्या प्रस्तावानुसार, ही ट्रेन आठवड्यातून सहा दिवस चालवली जाणार आहे. गोरखपूरपासून संध्याकाळी ७ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता आग्रा किल्ल्यावर पोहोचेल. यामुळे उत्तर प्रदेश मधील गोरखपूरहुन आग्र्याला जाणे सोयीचे होणार आहे.
या ट्रेनचा व्यवसायिकांना आणि पर्यटकांना मोठा फायदा होणार आहे. तथापि रेल्वे बोर्डाने या प्रस्तावावर अजून कोणताच निर्णय घेतलेला नाही. पण जर रेल्वे बोर्डाने हा प्रस्ताव मान्य केला तर गोरखपूर ते आग्रा या दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार आहे.