Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. आता वंदे भारत एक्सप्रेसचे स्लीपर व्हर्जन लॉन्च होणार आहे. अर्थातच शयनयान वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरू होणार आहे. येत्या तीन महिन्यात ही गाडी रुळावर येण्याची शक्यता आहे. स्वतः केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीचं ही माहिती दिली आहे.
खरे तर वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली सेमी हायस्पीड ट्रेन आहे. ही गाडी पहिल्यांदा 2019 मध्ये सुरू झाली. नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर या गाडीला हिरवा झेंडा दाखवला गेला. यानंतर देशातील इतर महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू झाली.
सध्या देशातील 55 महत्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरु आहे. महत्त्वाचे म्हणजे यापैकी तीन गाड्यांना 31 ऑगस्टला हिरवा झेंडा मिळाला आहे. आपल्या महाराष्ट्रालाही आठ वंदे भारत एक्सप्रेस मिळालेल्या आहेत.
ज्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत तेथील प्रवाशांचा प्रवास गतिमान झाला असून या गाड्यांना प्रवाशांच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद दाखवला जात आहे. या ट्रेनमुळे रेल्वेच्या उत्पन्नात भर पडली आहे. यामुळे आता या ट्रेनचे स्लीपर वर्जन लाँच केले जाणार आहे.
केंद्रीय रेलवे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल अर्थातच रविवार (०१ सप्टेंबर) ला बेंगळुरूमधील भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) कारखान्यात वंदे भारत स्लीपर ट्रेनची तपासणी केली. तसेच वंदे भारत स्लीपर ट्रेनची झलक सुद्धा दाखवली.
वंदे भारत स्लीपर ट्रेन येत्या ३ महिन्यांत म्हणजेच नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत सुरू होईल आणि तिचे उत्पादन पूर्ण झाले असल्याची माहिती अश्विनी वैष्णवी यांनी यावेळी प्रसार माध्यमांना दिली. आगामी वंदे भारत स्लीपर ट्रेन ही 800 ते 1200 किलोमीटर एवढ्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तयार करण्यात आली आहे.
यामुळे लांब पल्याचा प्रवास देखील आरामदायी होणार आहे. प्रवासी 10 वाजता या ट्रेनमध्ये चढतील आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचतील. या 16 डब्यांच्या ट्रेनमध्ये 11- 3-AC, 4- 2-AC आणि एक 1-AC कोच राहणार आहे.
तिकीट दर कसे असतील?
वंदे भारत एक्सप्रेस ही कमाल 160 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावणारी भारतातील सर्वाधिक जलद आणि सुरक्षित ट्रेन आहे. विशेष म्हणजे यामध्ये प्रवाशांसाठी अनेक वर्ड क्लास सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
पण या गाडीचे तिकीट दर खूपच अधिक आहे. यामुळे ही गाडी फक्त उच्चवर्गीय श्रीमंत लोकांसाठी सुरू करण्यात आली आहे असा आरोपही केला जातो. अशा परिस्थितीत वंदे भारत स्लीपर ट्रेन चे तिकीट दर कसे राहणार याबाबत जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे.
मीडिया रिपोर्टनुसार वंदे भारत स्लीपर ट्रेनची रचना ही मध्यमवर्गीयांसाठी करण्यात आली आहे. यामुळे या ट्रेनचे भाडे चेअरकार वंदे भारत एक्सप्रेस पेक्षा कमी राहणार आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनचे भाडे राजधानी ट्रेनप्रमाणेच असेल असा दावाही केला जात आहे.