Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत एक्सप्रेसच्या अभूतपूर्व यशानंतर आता वंदे भारत स्लीपर ट्रेनकडे भारतीयांचे लक्ष लागले आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, वंदे भारत एक्सप्रेस ही एक चेअर कार एक्सप्रेस ट्रेन आहे. यामुळे ही गाडी लांब पल्ल्याच्या मार्गावर चालवता येत नाहीये. ही गाडी रात्री सुद्धा चालवली जात नाही.
या गाडीमध्ये फक्त बसण्याची व्यवस्था आहे मात्र लांबच्या प्रवासासाठी शयनयान आसन व्यवस्था असणे देखील आवश्यक आहे. हीच बाब लक्षात घेऊन आता भारतीय रेल्वेच्या माध्यमातून स्लीपर वंदे भारत ट्रेन देखील रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी चालवली जाणार आहे.
सध्या स्थितीला वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर धावत आहे. दहा मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे.
यामध्ये मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद या मार्गावरील वंदे भारत ट्रेन चा देखील समावेश होतो. या ट्रेनमुळे मुंबईहून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसची संख्या सहा वर पोहोचली आहे.
सध्या स्थितीला मुंबईवरून मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे.
आता मात्र प्रवाशांना स्लीपर वंदे भारतची प्रतीक्षा आहे. पण, त्यासाठी त्यांना आणखी किमान दोन वर्षे वाट पहावी लागणार असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वंदे भारत स्लीपर ट्रेनचे उत्पादन करण्यापूर्वी त्याची प्रतिकृती तयार करावी लागणार आहे.
पण याच कामासाठी आणखी किमान एक वर्ष लागण्याची शक्यता आहे. लातूर येथील मराठवाडा कोच कारखान्यात वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार होणार आहे. आता आपण वंदे भारत स्लीपर ट्रेन नेमकी कशी राहणार हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कशी राहणार वंदे भारत स्लीपर ट्रेन ?
मिळालेल्या माहितीनुसार, वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये १६ डबे, १ फर्स्ट क्लास एसी डबा, ३ वातानुकूलित द्वितीय श्रेणी डबे, १२ वातानुकूलित तृतीय श्रेणी डबे राहणार आहेत. ही ट्रेन लांब पल्ल्याच्या मार्गावर चालवली जाऊ शकते.
विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी देखील वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवली जाणार आहे. या गाडीची प्रतिकृती 2025 पर्यंत तयार होईल यानंतर मग त्याची चाचणी घेतली जाणार आहे आणि प्रत्यक्षात वंदे भारत एक्सप्रेस ही 2026 मध्ये रुळावर धावताना आपल्याला दिसणार आहे.
सर्वप्रथम ही गाडी मुंबई ते दिल्ली या मार्गावर सुरू होऊ शकते असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. अर्थातच देशातली पहिली स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आपल्या महाराष्ट्रातून धावणार आहे.