Vande Bharat Sleeper Train : 2019 मध्ये सुरू झालेल्या वंदे भारत एक्सप्रेसचे स्लीपर वर्जन आता लवकरच लॉन्च होणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरुवातीला नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली. या मार्गावर चालवण्यात आलेल्या ट्रेनला प्रवाशांनी खूपच चांगला प्रतिसाद दाखवला आणि यामुळे रेल्वेने 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीत देशातील महत्त्वाच्या 51 मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवला आहे.
या सर्वच्या सर्व वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांच्या माध्यमातून चांगला प्रतिसादही मिळत आहे. यामुळे आगामी काळात वंदे भारत एक्सप्रेसची संख्या आणखी वाढणार हे स्पष्ट आहे. आतापर्यंत आपल्या महाराष्ट्राला आठ वंदे भारत एक्सप्रेस मिळालेल्या आहेत.
तसेच, आगामी काळातही नवीन वंदे भारत ट्रेन आपल्या महाराष्ट्राला मिळतं राहणार आहेत. अशातच आता देशातील रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस लवकरच रुळावर धावणार आहे.
या गाडीचा रुळावर धावण्याचा मुहूर्त आता ठरला आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या स्लीपर वर्जनची येत्या 2 महिन्यांनी अर्थातच ऑगस्ट महिन्यापासून चाचणी घेतली जाणार असल्याची बातमी समोर आली आहे.
विशेष म्हणजे पाच ते सहा महिने चाचणी घेतल्यानंतर 2024 अखेरपर्यंत म्हणजेच डिसेंबर 2024 पर्यंत ही गाडी प्रत्यक्ष रूळावर धावणार आहे म्हणजे सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांसाठी चालवली जाणार आहे.
सर्वप्रथम वंदे भारत स्लीपर ट्रेन दिल्ली ते कोलकत्ता किंवा दिल्ली ते मुंबई या मार्गावर चालवली जाऊ शकते असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. जर दिल्ली ते मुंबई या मार्गावर ही गाडी धावली तर दोन्ही राजधान्यांमधला प्रवास हा जलद होणार आहे.
या गाडीचे तिकीट दर किती राहणार या संदर्भात अजून कोणतीच माहिती समोर आलेली नाही. मात्र मीडिया रिपोर्ट्स मध्ये शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेसच्या तुलनेत दहा ते पंधरा टक्के अधिकचे भाडे या ट्रेनने प्रवास करण्यासाठी द्यावे लागू शकते असे म्हटले जात आहे.