Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन आहे. ही ट्रेन 2019 मध्ये रुळावर आली होती. तेव्हापासून आत्तापर्यंत देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरु झाली आहे. विशेष म्हणजे वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद देखील दाखवला जात आहे.
या गाडीचे तिकीट दर हे इतर एक्सप्रेस ट्रेन पेक्षा अधिक आहेत तरीही या गाडीने प्रवास करण्यास अधिक पसंती दाखवली जात आहे हे विशेष. मात्र ही गाडी सध्या स्थितीला फक्त चेअर कार प्रकारात आहे. यामुळे ही ट्रेन वंदे भारत व्हर्जन मध्ये देखील सुरू झाली पाहिजे अशी मागणी होती.
भारतीय रेल्वेचा देखील तसाच प्लॅन होता. दरम्यान आता भारतीय रेल्वे लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन लॉन्च करणार आहे. मध्यंतरी मीडिया रिपोर्ट्स मध्ये देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन पुणे ते सिकंदराबाद या मार्गावर चालवली जाऊ शकते असा दावा केला जात होता.
आता मात्र मीडिया रिपोर्ट्स मध्ये देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन पुणे ऐवजी मुंबईला मिळणार असल्याचा नवीन दावा समोर आला आहे. पुढील महिन्यात म्हणजेच ऑगस्ट महिन्यात ही ट्रेन लॉन्च होणार आहे. ही गाडी लांब पल्ल्याच्या मार्गावर चालवली जाणार आहे.
पहिली स्लीपर ट्रेन कोणत्या मार्गावर धावणार
देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन महाराष्ट्राला मिळणार आहे. आधी ही गाडी पुणे ते सिकंदराबाद या मार्गावर चालवली जाणार असे म्हटले जात होते. मात्र आता मुंबई ते सिकंदराबाद या मार्गावर पहिली स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होऊ शकते अशी बातमी समोर आली आहे.
केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांनी याबाबत दक्षिण मध्य रेल्वेच्या जीएमला सूचना दिल्या आहेत. तसा प्रस्ताव त्यांनी रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे. त्यांनी रेल्वेचे जीएम अरुण कुमार यांना सुचवले की पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन फक्त याच मार्गावर चालवली जावी, कारण सध्या या शहरांदरम्यान वंदे भारत ट्रेन चालत नाही.
त्याचवेळी आणखी एक माहिती समोर आली आहे की, सिकंदराबाद-पुणे दरम्यान चेअर कार वंदे भारत सुरू केली जाऊ शकते, जी शताब्दी एक्स्प्रेसची जागा घेऊ शकते.