Vande Bharat Metro Train : 2019 मध्ये वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेच्या ताफ्यात आली, अन तेव्हापासून भारतीय रेल्वेचा पूर्ण कायापालट झाला आहे. वंदे भारत एक्सप्रेस मुळे प्रवाशांचा प्रवास आधीच्या तुलनेत अधिक जलद, सुरक्षित आणि अगदीच आरामदायी झाला आहे. यामुळे या ट्रेनला प्रवाशांकडून भरभरून असा प्रतिसाद दाखवला जातोय.
प्रत्येक भागातून या ट्रेन साठी जोरदार पाठपुरावा केला जात आहे. महाराष्ट्रातीलही अनेक जिल्ह्यांमधून या ट्रेनसाठी पाठपुरावा सुरू आहे. सध्या भारतातील ५५ महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू असून येत्या 15 सप्टेंबरला आणखी दहा नवीन गाड्या चालवल्या जाणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी या दहा नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. नागपूर ते सिकंदराबाद आणि पुणे ते हुबळी या महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या मार्गांवर देखील वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चे संचालन आगामी काळात पाहायला मिळणार आहे.
नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस ला 15 सप्टेंबरला हिरवा झेंडा दाखवला जाऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे या गाडीच्या यशानंतर आता या गाडीचे स्लीपर व्हर्जन देखील रुळावर येणार आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेन देखील लवकरच सुरू होणार आहे.
येत्या तीन महिन्यात या प्रकारातील पहिली स्लीपर ट्रेन रूळावर धावणार असल्याची माहिती समोर येत आहे. स्वतः रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीचं ही माहिती दिली आहे. याशिवाय भारतात वंदे भारत मेट्रो सुद्धा सुरु केली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वंदे भारत मेट्रोच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. तसेच लवकरच देशातील पहिली वंदे भारत मेट्रो सुरु होणार आहे. 16 सप्टेंबरला देशातील पहिली वंदे भारत मेट्रो सुरु होऊ शकणार आहे.
पण, ही पहिली गाडी आपल्या महाराष्ट्राला मिळणार नाही. देशातील पहिली वंदे भारत मेट्रो गुजरातला दिली जाणार आहे. ही ट्रेन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरु केली जाणार आहे.
कोणत्या मार्गावर चालवली जाणार देशातील पहिली वंदे भारत मेट्रो ?
मिळालेल्या माहितीनुसार, भूज ते अहमदाबाद या मार्गावर देशातील पहिली वंदे भारत मेट्रो चालवली जाणार आहे. ही गाडी 130 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावेल. ही ट्रेन आठवड्यातुन 6 दिवस चालवली जाणार आहे. 16 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी या गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. आता आपण या गाडीचे वेळापत्रक जाणून घेणार आहोत.
कसं असणार वेळापत्रक ?
ही गाडी भुज स्थानकावरून सकाळी ५ वाजून ०५ मिनिटांनी सोडली जाणार आहे अन सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी अहमदाबादला पोहोचणार आहे. ही ट्रेन परतीच्या प्रवासात पहिली अहमदाबादहून सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी निघेल आणि त्याच दिवशी रात्री ११ वाजून २० मिनिटांनी भुजला पोहोचणार आहे.
कुठं मिळणार थांबा ?
ही भुज ते अहमदाबाद दरम्यानची पहिली वंदे भारत मेट्रो अंजार, गांधीधाम, भचाऊ, समखियाली, हलवद, ध्रांगध्रा, विरमगाम, चांदलोडिया आणि साबरमती या स्थानकांवर थांबा घेणार आहे.