Vande Bharat Metro Train : वंदे भारत एक्सप्रेस च्या अभूतपूर्व यशानंतर आता वंदे भारत मेट्रो देखील सुरू होणार आहे. खरेतर, सध्या देशातील 55 महत्वाच्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे. या ट्रेनला प्रवाशांच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद मिळतोय. हेच कारण आहे की या गाडीचे जाळे विस्तारण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला 10 नवीन वंदे भारत एक्सप्रेस देणार आहेत. यामध्ये नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत ट्रेन चा देखील समावेश आहे. वंदे भारत एक्सप्रेसनंतर आता भारताला वंदे भारत मेट्रोचीही भेट मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वंदे भारत मेट्रोला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. देशातील या प्रकारातील ही पहिली ट्रेन गुजरात राज्याला मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
अहमदाबाद ते भुज या 344 किलोमीटर लांबीच्या मार्गावर ही गाडी चालवली जाणार आहे. या गाडीमुळे अहमदाबाद ते भुज दरम्यान चा प्रवास अवघ्या पावणे सहा तासात पूर्ण करता येणार आहे.
आता आपण या देशातील पहिल्या वंदे भारत मेट्रो ट्रेनला कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा राहणार आणि या गाडीचे वेळापत्रक कसे राहणार या संदर्भात माहिती पाहणार आहोत.
कसे राहील वेळापत्रक?
रेल्वेने सांगितल्याप्रमाणे भुज-अहमदाबाद वंदे भारत मेट्रो सकाळी साडेपाच वाजता भुज रेल्वे स्थानकावरून रवाना होणार आहे. तसेच सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांनी ही गाडी अहमदाबाद रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
तसेच अहमदाबाद भुज वंदे भारत मेट्रो सायंकाळी सायंकाळी साडेपाच वाजता अहमदाबाद रेल्वे स्थानकावरून सुटणार आहे आणि रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी ही गाडी भुज रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
कुठं राहणार थांबा?
या वंदे भारत मेट्रो ट्रेनला अंजार, गांधीधाम, भचाळ, समखियाली, हलवड, ध्रांगध्रा, विरमगाम, चांदलोडिया, साबरतमी या नऊ स्थानकांवर थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती रेल्वेने दिलेली आहे.