Vande Bharat Metro Train : 2019 मध्ये वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील संपूर्ण स्वदेशी बनावटीची पहिली हायस्पीड ट्रेन रुळावर धावली होती. 2019 मध्ये ही गाडी लॉन्च झाली आणि तेव्हापासून आत्तापर्यंत देशातील 52 महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू झाले आहे. विशेष म्हणजे या गाडीला प्रवाशांच्या माध्यमातून चांगला प्रतिसादही मिळत आहे.
हेच कारण आहे की, आगामी काळात या वंदे भारत एक्सप्रेसचे जाळे आणखी विस्तारले जाणार आहे. यामुळे प्रवाशांना सुरक्षित, जलद आणि आरामदायी प्रवास अनुभवता येत आहे.
वर्ल्ड क्लास सोयी सुविधांनी युक्त ही वंदे भारत एक्सप्रेस वेगवेगळ्या मार्गावर चालवण्यासाठी सातत्याने रेल्वे कडे पाठपुरावा केला जात आहे. दरम्यान आता वंदे भारत एक्सप्रेसच्या यशानंतर भारतीय रेल्वेने वंदे भारत मेट्रो ट्रेन लॉन्च केली आहे.
खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून ऑगस्ट महिन्यात वंदे भारत मेट्रो ट्रेन लॉन्च होणार असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात होता. अखेरकार ही मेट्रो ट्रेन आता लॉन्च करण्यात आली आहे.
ही गाडी 100 ते 200 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या प्रमुख शहरांना जोडणी देण्याचे काम करणार आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास सोयीचा होणार आहे. दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही ट्रेन फायदेशीर ठरणार आहे.
वंदे भारत मेट्रोचे ट्रायल रन चेन्नई बीच ते कटपाडी जंक्शन यादरम्यान सूरु झाले आहे. आता या गाडीची चाचणी पूर्ण झाल्यानंतर ही गाडी सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरू केली जाणार आहे.
मात्र ही गाडी पहिल्यांदा कोणत्या मार्गावर चालवली जाणार या संदर्भात अजून कोणतीही अधिकृत माहिती हाती आलेली नाही. पण, दिल्ली ते आग्रा या व्यस्त मार्गांवर वंदे भारत मेट्रो ट्रेन पहिल्यांदा चालवली जाऊ शकते असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे.
यामुळे ही वंदे भारत मेट्रो ट्रेन नेमकी कोणत्या मार्गावर चालवली जाणार हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. ही संपूर्ण गाडी एसी राहणार आहे. या ट्रेनच्या एका कोचमध्ये 100 लोकांना बसण्याची आणि 200 लोकांना उभे राहण्याची व्यवस्था राहणार आहे.
या मेट्रो ट्रेनमध्ये वंदे भारत एक्सप्रेस सारख्याच सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे वंदे भारत मेट्रो ट्रेन मुंबई, पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहरांमधूनही चालवल्या जाणार आहेत.