Vande Bharat Metro News : वंदे भारत एक्सप्रेस ला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर भारतीय रेल्वेच्या माध्यमातून लवकरच वंदे मेट्रो सुरू होणार आहेत. वंदे भारत एक्सप्रेसच्या धरतीवर सुरू होणारी ही वंदे मेट्रो 100 किमीच्या आत वसलेल्या दोन शहरांना कनेक्ट करण्याचे काम करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही वंदे मेट्रो गाडी 2023 पर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. यानंतर 2024-25 मध्ये या गाड्यांचे उत्पादन वाढवले जाणार आहे.
या वंदे भारत मेट्रो कामानिमित्त एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणाऱ्या लोकांना तसेच विद्यार्थ्यांना अधिक उपयुक्त राहणार आहेत. या ट्रेन जागतिक दर्जाच्या प्रवासाचा अनुभव प्रवाशांना देण्यास सक्षम राहतील असा दावा रेल्वेच्या माध्यमातून केला जात आहे. ही ट्रेन रेल्वेच्या ताब्यात आल्यानंतर लोकल ट्रेन वरील भार कमी होण्यास मदत होणार आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांना जलद गतीने प्रवास करता येणार आहे. शिवाय स्वस्तात आरामदायी प्रवास प्रवाशांना लाभणार आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी खुशखबर! बोरिवली ते विरारदरम्यान प्रवास होणार गतिमान; ‘या’ एका कारणामुळे लोकल ट्रेनचा वेग वाढणार
कशी असेल वंदे मेट्रो?
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी या ट्रेन बाबत मोठी माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही ट्रेन 100 किलोमीटरच्या आत वसलेल्या शहरांदरम्यान सुरू केली जाणार आहे. ही ट्रेन एका दिवसात चार ते पाच फेऱ्या मारणार आहे. विशेष म्हणजे वंदे मेट्रोचा स्पीड हा वंदे भारत एक्सप्रेस पेक्षा अधिक राहू शकतो.
शिवाय या गाडीचे तिकीट दर हे इतर गाडींच्या तुलनेत कमी असतील असे मत व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रवाशांना जलद आणि स्वस्तात प्रवास करता येणे शक्य होणार आहे. वंदे मेट्रोमध्ये आठ डबे राहणार आहेत. अर्थातच वंदे मेट्रो वंदे भारत एक्सप्रेस पेक्षा लहान राहील. या ट्रेनचा सर्वाधिक लाभ दैनंदिन प्रवाशांना होणार आहे. दैनंदिन प्रवाशांना स्वस्तात आणि जलद गतीने या ट्रेनमुळे प्रवास करता येणार आहे.
हे पण वाचा :- मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची ‘या’ कारणाने चिंता वाढली ! पहा….
वंदे भारत एक्सप्रेस विषयी
वंदे भारत एक्सप्रेसची सुरुवात 2019 मध्ये झाली. त्यानंतर अल्पावधीतच ही ट्रेन प्रवाशांच्या पसंतीस खरी उतरली. यामुळे केंद्र शासनाने ही ट्रेन देशातील सर्वच महत्त्वाच्या मार्गावर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आत्तापर्यंत एकूण 16 मार्गांवर ही ट्रेन सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ऑगस्ट महिन्यापर्यंत 75 वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहेत. तसेच येत्या दोन वर्षात देशभरात एकूण 400 वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा मानस सरकारचा आहे.
हे पण वाचा :- मुंबईमधील मेट्रो प्रवाशांसाठी महत्वाची बातमी; आता अंधेरी ते बीकेसी प्रवास होणार सुसाट, पहा सविस्तर