Vande Bharat Express : नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांमध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ख्यातनाम असलेल्या पुणे शहराला आणखी एका वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार असल्याचे वृत्त समोर आले होते.
खरंतर सध्या स्थितीला पुणे शहरातून थेट वंदे भारत एक्सप्रेस धावत नाहीये. पण मुंबई ते सोलापूर या मार्गावर सुरू असणारी वंदे भारत ट्रेन पुणे मार्गे धावत आहे. दरम्यान, पुणे शहरातून थेट वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरू होणार असा दावा केला जात आहे.
पुणे ते वडोदरा या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. तथापि या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस केव्हा धावणार याबाबत कोणतीच माहिती हाती आलेली नाही.
अशातच मात्र देशातील आणखी एका महत्त्वाच्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाणार आहे. मीडिया रिपोर्ट नुसार रांची ते वाराणसी या मार्गावर Vande Bharat Train चालवली जाणार आहे.
याबाबत रांचीच्या खासदारांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी माहिती दिली होती. त्यांनी या मार्गावर लवकरच ही सेमी हाय स्पीड ट्रेन सुरू होणार असल्याचे संकेत दिले होते. दुसरीकडे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव 21 नोव्हेंबरला अर्थातच येत्या सात दिवसात झारखंडमध्ये येणार आहेत.
चक्रधरपूर रेल्वे विभागांतर्गत होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते रांचीला जातील अशी माहिती समोर येत आहे. यामुळे या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय रेल्वेमंत्री या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे.
रांची-वाराणसी वंदे भारत चालवण्याची तारीख रेल्वे मंत्री स्पष्ट करतील अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी या मार्गांवरील वंदे भारत सुरू होणार असा दावा करण्यात आला आहे.
अर्थातच डिसेंबर 2023 पर्यंत या मार्गावर वंदे भारत ट्रेन चालवली जाईल असे सांगितले जात आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली आहे. दरम्यान या मार्गावर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस रांची ते वाराणसी हा प्रवास तेरा तासांपेक्षा कमी कालावधीत पूर्ण करणार आहे.
यामुळे या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास जलद आणि सुरक्षित होईल अशी आशा आहे. या ट्रेनमुळे झारखंड मधील भाविक भक्तांना काशी विश्वेश्वराचे दर्शन घेणे सोपे होणार आहे.