Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस बाबत एक मोठी गुड न्यूज समोर येत आहे. ही देशातील संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली हाई स्पीड ट्रेन आहे. ही गाडी सर्वप्रथम 2019 मध्ये सुरू झाली होती. तेव्हापासून आत्तापर्यंत देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. लोकसभेची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी देशाला एकूण दहा वंदे भारत एक्सप्रेस मिळाल्या आणि यामुळे वंदे भारत एक्सप्रेसची संख्या 51 वर पोहोचली आहे.
अशातच मात्र या गाडी संदर्भात आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार देशाला लवकरच आणखी एक नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. ही गाडी एर्नाकुलम ते बेंगलुरु या मार्गावर चालवली जाणार आहे.
याशिवाय आपल्या राज्याला देखील नवीन वंदे भारत ट्रेन दिली जाणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, एर्नाकुलम मार्शलिंग यार्ड येथे पिट लाइन विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर अनेक गाड्यांचा मार्ग मोकळा होणार आहे.
एर्नाकुलम-बेंगळुरू या मार्गांवर बहुप्रतिक्षित वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होण्याचा मार्ग देखील मोकळा होणार आहे. तसेच यामुळे नजीकच्या भविष्यात एर्नाकुलम येथून अनेक एक्स्प्रेस गाड्या सुरू होऊ शकणार आहेत.
कसं राहणार वेळापत्रक
मीडिया रिपोर्ट नुसार ही ट्रेन एर्नाकुलम येथून पहाटे 5 वाजता सुटेल आणि दुपारी 1:35 वाजता बेंगळुरूला पोहोचेल. तसेच ही गाडी परतीच्या प्रवासात बेंगळुरूहून दुपारी 2:05 वाजता सुटणार आहे आणि 10:45 वाजता एर्नाकुलमला पोहोचणार आहे.
कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार
हाती आलेल्या माहितीनुसार या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ला या मार्गावरील काही मोजक्या स्थानकावर थांबा मंजूर केला जाणार आहे.
ही ट्रेन आपल्या प्रवासात त्रिशूर, पलक्कड, कोईम्बतूर, इरोड आणि सेलम या स्थानकांवर थांबणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तथापि, या गाडीच्या वेळापत्रकाबाबत आणि थांब्याबाबत अजूनही रेल्वे कडून अधिकृत माहिती मिळालेली नाहीये.
महाराष्ट्रालाही मिळणार वंदे भारत ट्रेन
नुकत्याच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील कोल्हापूरला नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची भेट मिळणार अशी घोषणा केली आहे.
सध्या राज्यात आठ वंदे भारत एक्सप्रेस सुरू असून कोल्हापूरला जर वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली तर राज्यातील वंदे भारत एक्सप्रेसची संख्या वाढणार आहे.
विशेष बाब अशी की कोल्हापूरहून धावणारी ही वंदे भारत ट्रेन मुंबईपर्यंत चालवली जाणार आहे. कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर ही गाडी सुरू होईल असा अंदाज आहे. असे झाल्यास कोल्हापूर ते मुंबई दरम्यान चा प्रवास आणखी गतिमान होणार आहे.