Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील पहिली मेक इन इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत तयार झालेले संपूर्ण भारतीय बनावटीची हाई स्पीड ट्रेन आहे. या गाडीच्या सध्या मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. खरंतर, 2019 मध्ये पहिली वंदे भारत सुरु झाली होती.
यानंतर मग टप्प्याटप्प्याने देशातील महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. आतापर्यंत देशातील 34 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे आगामी वर्षात अर्थातच 2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत आणि महाराष्ट्रात विधानसभेच्या देखील निवडणुका राहणार असल्याने देशातील आणखी काही महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू केली जाणार आहे.
आपल्या महाराष्ट्राला देखील आणखी काही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मिळणार आहेत. महाराष्ट्राचा विचार केला असता सध्या आपल्या राज्यात 6 वंदे भारत एक्सप्रेस चालवल्या जात आहेत.
दरम्यान पुणे ते सिकंदराबाद, पुणे ते शेगाव, पुणे ते वडोदरा, मुंबई ते शेगाव, मुंबई ते जालना या मार्गावर सुद्धा वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचे नियोजन आहे.
विशेष म्हणजे मुंबई ते जालना वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनाची तारीख देखील डिक्लेअर करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई ते जालना वंदे भारत एक्सप्रेस ला लवकरच हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
केव्हा सुरु होणार मुंबई-जालना वंदे भारत
एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेस 30 डिसेंबर 2023 रोजी सुरु होणार आहे. या गाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
विशेष म्हणजे या तारखेला नरेंद्र मोदी अमृतसर-नवी दिल्ली वंदे भारत ट्रेन, अयोध्या-नवी दिल्ली, दरभंगा-नवी दिल्ली, वैष्णो देवी-दिल्ली, कोईम्बतूर-बेंगलोर, या वंदे भारत ट्रेनला देखील हिरवा झेंडा दाखवणार असल्याचे सांगितले जात आहे.
खरं तर जालना सहित संपूर्ण मराठवाड्यातील नागरिक दररोज दैनंदिन कामासाठी राजधानी मुंबईमध्ये येत असतात.
याशिवाय मुंबईमधूनही हजारो नागरिक जालन्याला जात असतात. अशा परिस्थितीत या दोन्ही शहरादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या गाडीचा मोठा दिलासा मिळणार आहे.