Vande Bharat Express : गेल्या काही वर्षांपासून भारतातील रेल्वे प्रवाशांमध्ये वंदे भारत एक्सप्रेस बाबत मोठ्या चर्चा पाहायला मिळत आहेत. ही गाडी अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस खरी उतरली आहे. देशात एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी रेल्वेचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.
रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अशा परिस्थितीत रेल्वे प्रवाशांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय देखील भारतीय रेल्वे कडून घेतले जात आहेत. यात रेल्वे प्रवाशांचा प्रवास गतिमान आणि सुरक्षित करण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस चालवली जात आहे.
ही गाडी 2019 मध्ये सर्वप्रथम धावली. तेव्हापासून आत्तापर्यंत देशातील एकूण 25 महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी धावत आहे. विशेष बाब म्हणजे यापैकी पाच महत्त्वाचे मार्ग महाराष्ट्रातून जातात. अर्थातच महाराष्ट्राला आतापर्यंत पाच वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाले आहे.
तसेच आगामी काही महिन्यात राज्याला आणखी काही वंदे भारत एक्सप्रेसची सौगात दिली जाणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की आत्तापर्यंत महाराष्ट्रातून मुंबई ते गांधीनगर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते सोलापूर, मुंबई ते गोवा आणि नागपूर ते बिलासपूर या महत्त्वाच्या मार्गावर ही हाय स्पीड ट्रेन चालवली जात आहे.
अशातच आता देशाला आणखी दोन वंदे भारत एक्सप्रेसची भेट दिली जाणार असून भारतीय रेल्वे यासाठी तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, राजस्थान राज्याला दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहेत.
जयपूर ते उदयपूर आणि जयपूर ते चंदीगड या दोन महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू केली जाणार आहे. विशेष बाब अशी की जयपूर ते उदयपूर दरम्यानच्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस ची ट्रायल देखील घेण्यात आली आहे. मात्र असे असतानाही ही गाडी केव्हा सुरू होणार याबाबत रेल्वेच्या माध्यमातून कोणतीच माहिती देण्यात आलेली आहे.
दरम्यान चंदीगड ते जयपूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार की नाही याबाबत देखील कोणतीच माहिती हाती आलेली नाही. परंतु काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. सध्या राजस्थान मध्ये दोन महत्त्वाच्या मार्गावर ही हाय स्पीड ट्रेन सुरू आहे.
जयपूर ते दिल्ली आणि जोधपूर ते साबरमती या दोन महत्त्वाच्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू असून जयपूर ते उदयपूर आणि जयपूर ते चंदीगड या दोन मार्गावर येत्या काही महिन्यात वंदे भारत एक्सप्रेस सुरू होऊ शकते असा दावा केला जात आहे. निश्चितच या दोन मार्गावर जर ही गाडी सुरू झाली तर राजस्थान मधील या संबंधित मार्गावरील रेल्वे प्रवास सोयीचा होणार आहे यात शंकाच नाही.