Pune News : मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस सोलापूर आणि पुणेकरांसाठी एक मोठी भेट सिद्ध होत आहे. या एक्सप्रेस मुळे मुंबई पुणे आणि सोलापूर दरम्यान चा प्रवास अधिक गतिमान झाला असून यामुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाचत आहे.
हेच कारण आहे की या वंदे भारत एक्सप्रेसला मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस पेक्षा अधिक पसंती मिळत आहे. दरम्यान आता या एक्सप्रेस बाबत प्रवाशांच्या काही मागण्या देखील समोर आल्या आहेत.
खरं पाहता मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस ला आणखी एक थांबा, स्टॉप देण्याची मागणी प्रवाशांच्या माध्यमातून केली जात आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, मध्य रेल्वे विभागातील दौंड हे एक मोठे जंक्शन आहे.
मात्र असे असले तरी या जंक्शनवर वंदे भारत एक्सप्रेसला थांबा देण्यात आलेला नाही. त्यामुळे या स्टेशनला वंदे भारतचा थांबा मिळावा यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील पाठपुरावा केला आहे. एवढेच नाही तर आता प्रवासी संघटने कडून याबाबत पाठपुरावा सुरू आहे.
खरं पाहता, महाबळेश्वर, अष्टविनायक तसंच महाराष्ट्रातील इतर शक्तीपिठांना आणि तीर्थक्षेत्रांना जाण्यासाठी अनेक प्रवासी दौंड स्टेशनवर उतरत असतात. यामुळे दौंड स्टेशन वर वंदे भारत ट्रेनला थांबवण्याची मागणी प्रवाशांकडून तसेच काही लोकप्रतिनिधींकडून वारंवार मध्य रेल्वे विभागाकडे केली जात आहे.
सध्या वंदे भारत एक्स्प्रेसचा सोलापूर ते मुंबई मार्गावर फक्त कुर्डुवाडी हा एकच स्टॉप आहे. अशा परिस्थितीत दौंडला उतरणाऱ्या प्रवाशांना ‘वंदे भारत’चा फायदा होत नाही. अशातच आता रेल्वे प्रशासनाकडून या संदर्भात एक मोठी अपडेट देण्यात आली आहे.
हेही वाचा :- पुण्यात नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर ! ‘या’ बँकेत निघाली 12वी पास उमेदवारांसाठी पदभरती; आजच करा अर्ज
सोलापूर रेल्वे विभागीय व्यवस्थापक नीरज कुमार डोहारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे विभागानं अतिशय सखोल अभ्यास करून वंदे भारत ट्रेन ला कुठे स्टॉप किंवा थांबा द्यायचा याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सांगितलं की वंदे भारत ट्रेन गतिमान असल्याने कमी वेळात प्रवासासाठी ओळखली जात आहे.
दरम्यान आता दौंड स्टेशनवर येणाऱ्या प्रवाशांची संख्या आणि ‘वंदे भारत’ मधील एकूण सीट्स यांची संख्या याचा विचार करून दौंड स्टेशनवरील स्टॉप देण्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं नीरज कुमार यांनी यावेळी सांगितलं आहे.
ही मोठी बातमी वाचा :- Nashik-Pune Railway : नासिक-पुणे रेल्वे मार्गाचे भूसंपादन थांबणार; महारेलने पाठवले पत्र
तसेच त्यांनी सध्या तरी या प्रकारची कोणतीही तरतूद रेल्वे विभागाच्या वतीनं करण्यात आलेली नसल्याचे स्पष्टीकरण देखील यावेळी दिलं. एकंदरीत दौंड स्टेशनला थांबा देण्याची प्रवाशांची आणि लोकप्रतिनिधींची मागणी रेल्वे प्रशासनाकडे देखील विचाराधीन आहे.
यामुळे येत्या काही दिवसात एकतर दौंड स्टेशन वर थांबा देण्याबाबत रेल्वे विभागाकडून निर्णय घेतला जाईल किंवा थांबा का दिला जाऊ शकत नाही याबाबत स्पष्टीकरण पुढे येईल एवढे नक्की.
हे पण वाचा :- राजधानी मुंबईत नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी ! शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू; वाचा सविस्तर