Vande Bharat Express : भारताची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईमधील नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राजधानी मुंबईला लवकरच आणखी एका वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे.
ही गाडी मुंबईहून उत्तर प्रदेशसाठी सुरू होणार असा कयास लावला जात आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चर्चेत राहिली आहे.
या गाडीमध्ये दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा आणि या गाडीचा वेग यामुळे ही गाडी प्रवाशांमध्ये लोकप्रिय बनली आहे. सध्या देशातील 34 महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला सुरू करण्यात आले आहे.
पण लवकरच आणखी काही महत्त्वाच्या मार्गावर या गाडीचे संचालन सुरू होण्याची शक्यता आहे. अशातच एका मीडिया रिपोर्ट मध्ये असा दावा करण्यात आला आहे की, भारतीय रेल्वे लवकरच देशातील सहा महत्त्वाच्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालू करणार आहे.
या सहा वंदे भारत एक्सप्रेस उत्तर प्रदेशचे राजधानी लखनऊमधून सुरू होणार आहे. यात लखनऊ ते मुंबई दरम्यान देखील वंदे भारत एक्सप्रेस धावणार असा दावा करण्यात आला आहे.
सध्या मुंबईमधून किती वंदे भारत एक्सप्रेस सुरु आहेत
सध्या स्थितीला राजधानी मुंबई मधून चार वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव या चार मार्गांवर ही गाडी सुरू आहे. विशेष म्हणजे या मार्गांवरील वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांनी अभूतपूर्व असे प्रेम देखील दाखवले आहे.
मुंबईला मिळणार आणखी एक वंदे भारत
आता लखनऊ ते मुंबई या दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असा दावा करण्यात आला आहे. म्हणजे मुंबईमधील वंदे भारत एक्सप्रेसची संख्या वाढणार आहे.
जर मुंबई ते लखनऊ या मार्गावर ही गाडी सुरू झाली तर निश्चितच या मार्गावरील रेल्वे प्रवाशांचा प्रवास आधीच्या तुलनेत अधिक जलद आणि आरामदायी होणार आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशला जाणे अधिक सोयीचे होणार आहे. तसेच उत्तर प्रदेश मधील लोकांना रोजगाराच्या शोधात मुंबईमध्ये येणे आणखी सुलभ होणार आहे.
कोणत्या 6 मार्गावर सुरू होणार Vande Bharat
लखनऊ ते पटना, लखनऊ ते मुंबई, लखनऊ ते पुरी, लखनऊ ते कटरा, लखनऊ ते डेहराडून आणि लखनऊ ते मेरठ या सहा मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. गेल्या आठवड्यात तर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्वनी वैष्णव यांनी स्वतः लखनौ ते मेरठपर्यंत वंदे भारत ट्रेन चालवण्याची घोषणा केली होती.
यामुळे उर्वरित मार्गाची घोषणा देखील लवकरच होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या गाड्या आगामी लोकसभा निवडणुकीचा काळ पाहता निवडणुकीपूर्वीच सुरू होणार असे सांगितले जात आहे.