Vande Bharat Express : सध्या देशात वंदे भारत एक्सप्रेस बाबत मोठ्या चर्चा पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात या ट्रेनची लोकप्रियता वाढत आहे. 2019 मध्ये ही ट्रेन सुरू झाली आणि मात्र चार वर्षांच्या काळात ही गाडी तब्बल 25 महत्त्वाच्या मार्गावर सुरू करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील पाच मार्गाचा समावेश आहे.
म्हणजेच आपल्या राज्याला पाच वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची भेट मिळाली आहे. राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, नागपूर ते बिलासपूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते मडगाव या महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी धावत आहे.
तसेच या वर्षाच्या अखेरीस देशातील चार महत्त्वाच्या राज्यात विधानसभा निवडणुका होणार असल्याने आणि पुढल्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये लोकसभा निवडणुका होणार असल्याने केंद्रातील मोदी सरकार ही गाडी वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या मार्गावर चालवण्यासाठी जोमाने प्रयत्न करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भारतीय रेल्वे केंद्र शासनाच्या सूचनेनुसार 2024 पर्यंत देशातील 75 महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू करणार आहे. तसेच एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की राजस्थान राज्यात या वर्षाच्या अखेरीस इलेक्शन होणार असल्याने तिथे लवकरच आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाणार आहे.
इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर राजस्थानला आता चौथ्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. राजस्थान मध्ये सध्या स्थितीला जोधपूर ते साबरमती, जयपूर ते दिल्ली आणि जयपूर ते उदयपूर या तीन महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू आहे. दरम्यान आता राजस्थान मधील जयपूर ते चंदीगड दरम्यान ही गाडी सुरू केली जाणार आहे.
याबाबत भारतीय रेल्वे कडून कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही मात्र काही प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये याबाबत दावा करण्यात आला आहे. जयपूर ते चंदीगड हा रेल्वेमार्ग देशातील सर्वात व्यस्त रेल्वे मार्गांपैकी एक आहे. या मार्गावर कायमच प्रवाशांची गर्दी राहते. अशा परिस्थितीत या मार्गावर ही गाडी सुरू करण्याची मागणी अनेकांनी केली आहे.
या मार्गावर ही गाडी सुरू झाली तर हजारो प्रवाशांचा प्रवास गतिमान होणार आहे. यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात देखील भर पडणार आहे. दरम्यान ही गाडी या मार्गावर केव्हा सुरू होणार, या गाडीला कुठे स्टोपेज दिले जाणार, तिकीट दर किती राहणार याबाबत कोणतीच माहिती हाती आलेली नाही. आगामी काही दिवसात मात्र या संदर्भात सविस्तर अशी माहिती रेल्वेच्या माध्यमातून सार्वजनिक केली जाईल अशी शक्यता आहे.