Vande Bharat Express : 30 डिसेंबर 2023 ला देशात आठ वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहेत. यापैकी 6 गाड्या वंदे भारत एक्सप्रेस राहतील तर दोन गाड्या वंदे साधारण एक्सप्रेस अर्थातच अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन राहणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व गाड्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.
खरे तर, वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील एक लोकप्रिय गाडी आहे. या गाडीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. सर्वप्रथम ही गाडी 2019 मध्ये धावली होती.
यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतरही महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. सध्यास्थितीला देशातील 34 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
यामध्ये आणखी सहा वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची भर पडणार आहे. विशेष म्हणजे यापैकी एक गाडी महाराष्ट्रातून धावणार आहे. सध्या राज्यात या प्रकारच्या एकूण सहा गाड्या सुरू आहेत.
राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, नागपूर ते बिलासपूर, इंदोर ते नागपूर या 6 मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
दरम्यान, 30 डिसेंबरला राज्यातील जालना ते मुंबई या दरम्यान ही गाडी सुरू होणार आहे. ही गाडी छत्रपती संभाजी नगर मार्गे चालवली जाणार आहे.
यामुळे जालना, छत्रपती संभाजी नगरसह मराठवाड्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या गाडीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून होणार आहे.
पीएम मोदी अयोध्या येथून या गाडीचे उदघाट्न करणार आहोत. ही गाडी आठवड्यातून सहा दिवस चालवली जाणार आहे. ही आठ डब्यांची गाडी शनिवारपासून रुळावर धावणार असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या 6 मार्गांवर धावणार वंदे भारत ट्रेन
अयोध्या- आनंद बिहार टर्मिनल
कोईम्बतूर-बेंगळुरू
मंगळुरू-मडगाव
जालना-मुंबई
श्री माता वैष्णोदेवी कटरा-दिल्ली
अमृतसर- दिल्ली
या दोन मार्गावर धावणार अमृत भारत ट्रेन
अयोध्या-दरभंगा
मालना टाउन-बेंगळुरू