Vande Bharat Express : 10 फेब्रुवारी रोजी मुंबई सोलापूर आणि मुंबई शिर्डी या दोन वंदे भारत एक्सप्रेस चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करकमलाद्वारे करण्याचे नियोजन मध्ये रेल्वेच्या माध्यमातून आखण्यात आले आहे. या अनुषंगाने या दोन्ही वंदे भारत ट्रेनच्या चाचण्या देखील पूर्ण झाल्या आहेत.
या वंदे भारत ट्रेन मुळे मुंबईहून शिर्डी आणि सोलापूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे. यामुळे राजधानी मुंबईला जलद कनेक्टिव्हिटी लाभणार आहे. सी एस एम टी शिर्डी या वंदे भारत ट्रेन मुळे मुंबईमधील साई दर्शनाची इच्छा असलेल्या भाविकांना मात्र एका दिवसात साई दर्शन करता येणार आहे.
शिवाय मुंबई सोलापूर या ट्रेनमुळे सोलापूर वासियांना मोठा फायदा होणार आहे. विशेष बाब म्हणजे ही ट्रेन पुणे मार्गे धावणार असल्याने याचा पुणेकरांना देखील फायदा होणार आहे. वास्तविक पाहता मुंबई सोलापूर ही ट्रेन 19 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सर्वसामान्यांच्या सेवेत आणण्याचा बेत आखण्यात आला होता. मात्र त्यावेळी मध्ये रेल्वेला या संदर्भात नियोजन करता येणे शक्य नव्हते.
यामुळे हा उद्घाटन सोहळा पुढे ढकलण्यात आला. दरम्यान आता 10 फेब्रुवारी रोजी मध्य रेल्वेने या दोन वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन करण्याचे योजिले आहे. या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना देखील पूर्ण झाल्या आहेत. मात्र एका प्रतिष्ठित न्यूज एजन्सीला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप या वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून मंजुरी मिळालेली नाही.
मात्र असे असले तरी सी आर अधिकाऱ्यांनी 10 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या दोन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. या अनुषंगाने रविवारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी भेट देऊन परिस्थितीचा आढावा देखील घेण्यात आला आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मध्य रेल्वेच्या माध्यमातून 10 फेब्रुवारी रोजी म्हणजेच शुक्रवारी दुपारी तीन वाजता दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या दोन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी तयारी जवळपास पूर्ण करण्यात आली आहे. यामुळे दोन वंदे भारत ट्रेनचे नियोजित वेळेत उदघाटन होणार असल्याचे सांगितले जात आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून मंजुरी मिळालेली नसली तरी देखील लवकरच ही मंजुरी मिळेल आणि उद्घाटन वेळेतच होईल असा आशावाद देखील जाणकारांनी व्यक्त केला आहे.