Vande Bharat Express Vs Vande Bharat Metro Vs Vande Bharat Sleeper : 2019 मध्ये वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची सेमी हाय स्पीड ट्रेन सुरू करण्यात आली. तेव्हापासून भारतीय रेल्वेचा चेहरा बदलला आहे. सर्वात आधी ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली. यानंतर देशातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झंडा दाखवला आहे. आधी 55 महत्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू होती. म्हणजे सध्या 61 मार्गांवर ही गाडी सुरू झाली आहे. आगामी काळात आणखी काही नवीन मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू होणार आहे.
पुणे ते हुबळी, पुणे ते कोल्हापूर, नागपूर ते सिकंदराबाद या मार्गांवर देखील ही गाडी सुरू होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या अभूतपूर्व यशानंतर आता वंदे भारत मेट्रो ट्रेन आणि वंदे भारत स्लीपर ट्रेन देखील सुरू केली जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे वंदे भारत मेट्रो ट्रेन रूळावर आली आहे.
येत्या तीन महिन्यात वंदे भारत स्लीपर ट्रेन देखील प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण या तिन्ही गाड्यांचे तिकीट दर नेमके कसे आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
वंदे भारत एक्सप्रेस चे तिकीट दर : वंदे भारत एक्सप्रेस चे तिकीट दर हे अंतरावर अवलंबून असते. अलीकडेचं सुरू झालेल्या कोटा ते उदयपूर चेअर कारचे तिकीट दर 745 आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे तिकीट दर १४६५ रुपये एवढे आहे.
मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस बाबत बोलायचं झालं तर या गाडीचे तिकीट दर चेअर क्लास साठी अकराशे पन्नास रुपये आणि एक्झिक्युटिव्ह क्लास साठी 2185 रुपये एवढे आहे.
वंदे भारत स्लीपर ट्रेन चे तिकीट दर : अजून ही गाडी प्रत्यक्षात सुरू झालेली नाही. मात्र मीडिया रिपोर्टनुसार या गाडीच्या थर्ड एसी कोचचे तिकीट १५०० ते २००० रुपये, सेकंड एसी कोचसाठी २००० ते २५०० रुपये आणि फर्स्ट क्लासचे तिकीट ३००० ते ३५०० रुपये एवढे राहणार आहे.
या गाडीचे तिकीट दर हे राजधानी एक्सप्रेस एवढेच राहणार असा दावा केला जात आहे. स्वतः रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांनीचं ही माहिती दिली आहे.
वंदे भारत मेट्रो ट्रेनचे तिकीट दर : अहमदाबाद ते भुज दरम्यान वंदे भारत मेट्रो सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला आहे. या गाडीचे तिकीट तीस रुपये एवढे आहे.
महत्त्वाचे म्हणजे मंथली आणि आठवड्याचे एकाच वेळी तिकीट घेतले जाऊ शकते. यामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या सेवेचा फायदा होणार आहे.