Vande Bharat Express : महाराष्ट्रात सध्या वंदे भारत एक्सप्रेस बाबत मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. येत्या 10 फेब्रुवारी रोजी दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सीएसएमटी ते सोलापूर आणि सीएसएमटी ते शिर्डी दरम्यान धावणाऱ्या दोन वंदे भारत एक्सप्रेस ला हिरव्या झेंडा दाखवला जाणार आहे. यामुळे मुंबई-सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा मोठा वेळ देखील वाचणार आहे. दरम्यान आता सी एस एम टी या ठिकाणी वंदे भारत एक्सप्रेस दाखल झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी वंदे भारत एक्सप्रेस पोहोचली असून पोहचल्याबरोबर या वंदे भारत एक्सप्रेस ने आपल्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. अशा परिस्थितीत आज आपण वंदे भारत एक्सप्रेस च्या नावावर कोणता विक्रम नोंदला गेला आहे याविषयी जाणून घेणार आहोत.
खरं पाहता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी वंदे भारत एक्सप्रेस पोहोचली आहे. शिवाय या ट्रेनची ट्रायल देखील पूर्ण झाली आहे. यामुळे आता 10 फेब्रुवारी रोजी या दोन्ही वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन उद्घाटनासाठी सज्ज झाल्या आहेत. दरम्यान वंदे भारत ट्रेनने उद्घाटनापूर्वी एक मोठा विक्रम केला आहे. तो विक्रम असा की, इतिहासात पहिल्यांदाच एखादी ट्रेन कोणत्याही प्रकारचे बँकर इंजिन न लावता लोणावळा आणि खंडाळा येथील बोरघाट उतरून आली आहे.
म्हणजेच कोणतेही बँकर इंजिन न लावता वंदे भारत एक्सप्रेस घाट सेक्शन पार करण्यास सक्षम असल्याचे यावरून सिद्ध झाले आहे. येणाऱ्या काळात देखील या दोन्ही वंदे भारत एक्सप्रेस कसारा येथील थल घाट आणि लोणावळा येथील भोर घाट कोणतेही बँकर इंजिन न लावता चालवल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान मेक इन इंडिया अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या अत्याधुनिक अशा ट्रेनमध्ये घाट सेक्शन मध्ये बँकर इंजिन न लावता प्रवास करण्यासाठी विशेष पार्किंग ब्रेक्स लावण्यात आले आहेत, जेणेकरून उतार आणि चढाव यावर ही गाडी अपघातग्रस्त होणार नाही. निश्चितच, वंदे भारत एक्सप्रेस चर्चेत का आहे तर यासाठी तिच्या या विशेषता कारणीभूत आहेत.