Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील मेक इन इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत तयार झालेले संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली हाय स्पीड ट्रेन आहे. ही गाडी सर्वप्रथम 2019 मध्ये रुळावर धावली होती.
तेव्हापासून आतापर्यंत देशातील 34 महत्त्वाच्या मार्गावर या गाडीचे संचालन सुरू झाले आहे. विशेष बाब म्हणजे मार्च 2024 पर्यंत देशातील 75 महत्त्वाचा मार्गावर या गाडीला सुरू केले जाणार आहे.
अशातच आता वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. खरे तर वंदे भारत एक्सप्रेसच्या अभूतपूर्व यशानंतर आता भारतीय रेल्वेने वंदे भारत स्लीपर ट्रेन वर काम सुरू केले आहे.
ही स्लीपर वंदे भारत ट्रेन पुढील वर्षी मार्च महिन्यात सुरु होणार असा दावा केला जात आहे.
तत्पूर्वी मात्र स्लीपर डबे कसे आहेत, त्यांना प्रतिसाद कसा मिळतो, यासाठी रेल्वे आता सेवेत असलेल्या 34 वंदे भारत ट्रेनपैकी 4 गाडयांना एक ते दोन स्लीपर डबे जोडण्याच्या योजनेवर रेल्वे काम करत आहे.
म्हणजेच आता सध्या ज्या वंदे भारत ट्रेन सुरू आहेत त्यालाच दोन स्लीपर डब्बे जोडले जाणार आहेत.
सुरुवातीच्या टप्प्यात चार मार्गांवरील वंदे भारत एक्सप्रेसला हे स्लीपर डबे जोडले जातील असे वृत्त समोर आले आहे.
कोणत्या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला जोडले जाणार स्लीपर डब्बे ?
मीडिया रिपोर्टनुसार, वाराणसी-नवी दिल्ली, राणी कमलापती-हजरत निजामुद्दीन, माता वैष्णोदेवी कटरा-नवी दिल्ली, नागपूर-इंदौर या 4 मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मध्ये स्लीपर डब्बे जोडले जाणार आहेत.
मात्र या स्लीपर कोच डब्यांमधील तिकिटांचे दर हे वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकिटांपेक्षा भिन्न राहतील असे बोलले जात आहे.
नव्या स्लीपर कोच मधील तिकीट दर काय असले पाहिजेत याबाबत सध्या रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मंथन सुरु आहे.