Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस बाबत सध्या महाराष्ट्रात मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. 10 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात दोन वंदे भारत एक्सप्रेस चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचे योजिले आहे. या अनुषंगाने शासनाकडून तसेच मध्य रेल्वे कडून संपूर्ण तयारी देखील केली जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-शिर्डी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सोलापूर या दोन वंदे भारत एक्सप्रेसचं या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दरम्यान या वंदे भारत एक्सप्रेसचीं आता रेल्वे मंत्रालयातर्फे चाचणी देखील घेतली जात आहे.
दरम्यान एक वंदे भारत एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या ठिकाणी दाखल झाले असून दुसरी वंदे भारत एक्सप्रेस सात ते आठ फेब्रुवारी पर्यंत मुंबई या ठिकाणी दाखल होणार आहे. एक वंदे भारत एक्सप्रेस जी की गुरुवारी सीएसएमटी मुंबई येथे आली आहे तिची सध्या ट्रायल घेणे सुरू आहे. कसारा घाटात वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी घेण्यात आली असून 10 फेब्रुवारीपर्यंत रोज दोन ते तीन चाचण्या या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची कसारां घाटात घेतली जाणार आहे.
निश्चितच, सुरक्षेच्या दृष्टीने या चाचण्या घेणे अपरिहार्य असून रेल्वे विभागाकडून या चाचण्या पार पाडल्या जात आहेत. मात्र या वंदे भारत एक्सप्रेस चा ट्रायलमुळे गेल्या महिन्यात ज्या प्रमाणे वंदे भारत एक्सप्रेस चा मुहूर्त हुकला होता तसा यावेळी देखील हुकतो की काय अशी आशंका अनेकांना लागून आहे.
मात्र यावेळी 10 फेब्रुवारी रोजी फिक्स वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करकमलद्वारे रेल्वेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले असून यामध्ये कोणताच बदल झालेला नाही. यामुळे दहा फेब्रुवारी रोजी दोन वंदे भारत एक्सप्रेसची सौगात महाराष्ट्रवासियांना मिळणार आहे. दरम्यान आज आपण वंदे भारत एक्सप्रेसच्या रूट विषयी आणि तिच्या टाईम टेबल बद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी.
मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसचा रूट मॅप वेळापत्रक आणि तिकिटाचा दर
असा राहणार मुंबई-साईनगर शिर्डीचा प्रवास :- वंदे भारत एक्सप्रेस मॉर्निंगला सव्वासहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शिर्डीकडे रवाना होणार आहे. दुपारी ठीक बारा वाजून दहा मिनिटांनी हे वंदे भारत एक्सप्रेस साईनगर शिर्डी या ठिकाणी पोहोचेल.
असा राहणार शिर्डी ते मुंबईचा प्रवास :- सायंकाळी 5:25 ला साईनगर शिर्डी इथून वंदे भारत एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने रवाना होईल. रात्री अकरा वाजून 18 मिनिटांनी ही वंदे भारत एक्सप्रेस छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी पोहोचेल.
या दिवशी धावणार :- मुंबई ते शिर्डी दरम्यान धावणारी ही वनडे भारत एक्सप्रेस मंगळवार वगळता आठवड्याचे सर्व दिवस सुरू राहणार आहे.
हे राहतील थांबे :- मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसचे शिर्डी, नाशिक, ठाणे, दादर, मुंबई हे थांबे राहणार आहेत.
मुंबई शिर्डी तिकिटाचे दर :- मिळालेंल्या माहितीनुसार, मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करण्यासाठी चेअर कारसाठी 800 ते 1000 आणि एक्सिक्युटिव्ह क्लाससाठी 1600 ते 1800 रुपये दर राहणार आहेत.
मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.