Vande Bharat Express Train : मध्य रेल्वेच्या ताफ्यात लवकरच दोन वंदे भारत ट्रेन जोडल्या जाणार आहेत. 10 फेब्रुवारीला सी एस एम टी सोलापूर आणि सीएसएमटी शिर्डी या दोन वंदे भारत ट्रेन मध्ये रेल्वेच्या बेड्यात येणार आहेत. या ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्यानंतर मुंबईहून सोलापूर आणि मुंबईहून शिर्डी प्रवास जलद गतीने होणार आहे.
पूर्णपणे भारतीय बनावटीच्या या ट्रेन आपल्या अधिक गतीसाठी ओळखल्या जात आहेत. या ट्रेनचा स्पीड इतर एक्सप्रेसच्या तुलनेत अधिक असल्याने प्रवास गतिमान होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, आज आपण या ट्रेनमध्ये इतका स्पीड का असतो यासाठी कोणते तंत्रज्ञान नेमकं वापरण्यात आल आहे याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
वंदे भारत ट्रेनला अधिक स्पीड असण्याचे कारण
या ट्रेनचा अधिक स्पीड ट्रेनच्या एक्सटेरियर डिझाईन मुळे आहे. या ट्रेनचे डिझाईन हे एरोडाइनामिक या डिझाईन प्रकाराचे असल्याचे जाणकारांनी सांगितले आहे. आता तुम्ही म्हणत असाल या डिझाईनचा नेमका वेगाशी काय संबंध? तर आम्ही आपणास सांगू इच्छितो हे डिझाईन हवेच्या कोणत्याही अडथळ्याला कापण्यास सक्षम असते. यामुळे रेल्वेच्या मेन बॉडीच्या दोन्ही बाजूस समान हवा राखली जात आहे.
खरं पाहता, रेल्वे प्रशासनाने एल एस बी कोचेस यामध्ये लावले आहेत पण ही एक मेमो लोकल ट्रेन आधारित इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट या तंत्रज्ञानावर बांधून संपूर्णपणे स्वदेशी बनावटीने विकसित करण्यात आली आहे. या ट्रेनच्या बांधणुक करतांना डिझायनर लोकांनी या रेल्वेचे वजन कमी करण्याकडे अधिक लक्ष केंद्रित केले असून वजन कमी असल्याने हिला गती अधिक लाभत आहे. या ट्रेनमध्ये पावर सप्लाय करण्यासाठी पेंटाग्राफ वापरण्यात आले आहेत.
चार पेंटाग्राफ च्या माध्यमातून तयार होणाऱ्या इलेक्ट्रिक पावर जनरेशन वर या ट्रेनची पावर इतर ट्रेनच्या तुलनेत वाढल्याचे सांगितले जात आहे. यासोबतच या ट्रेनची अजून एक विशेषता आहे ती म्हणजे वळणावर ही ट्रेन झुकत असली तरी देखील प्रवाशांना याचा भास होणार नाही. यासाठी एक स्पेशल तंत्रज्ञान वापरण्यात आल आहे. मेजर कर्व्ह तंत्रज्ञान असे याचं नाव असून यामुळे वळणावर ही ट्रेन झूकेल मात्र प्रवाशांना याचा भास होणार नाही. यामुळे देखील या गाडीचा वेग वाढण्यास मदत झाल्याचं सांगितले गेले आहे.
आपणास 10 फेब्रुवारी रोजी मुंबई सोलापूर आणि मुंबई ते शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस उद्घाटन आयोजित असून या ट्रेनच्या रूट बाबत तसेच वेळापत्रक आणि तिकिटाच्या दरबाबत जाणून घायच असेल खालील लिंकवर क्लिक करा.