Vande Bharat Express Train Speed : वंदे भारत एक्सप्रेस म्हणजे भारतीय रेल्वेची शान. या गाडीचा देशात सध्या धुमाकूळ सुरु आहे. अगदी चहाच्या टपरी पासून ते मंत्रालयापर्यंत याच गाडीची चर्चा पाहायला मिळत आहे. या गाडीची चर्चा होण्याचे एक ना अनेक कारणे आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे या गाडीला लाभलेली गती. ही गाडी देशातील सर्वात वेगवान अन सुपरफास्ट ट्रेन आहे. यामुळे प्रवाशांना कमी वेळेत आपला प्रवास करता येत आहे.
प्रवाशांच्या वेळेत बचत होत आहे शिवाय प्रवाशांना आरामदायी प्रवास या गाडीने मिळत आहे. परिणामी 2019 मध्ये सुरू झालेली ही गाडी शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेस पेक्षा अधिक पसंत केली जात आहे. विशेष म्हणजे या गाडीचे भाडे हे इतर एक्सप्रेस ट्रेन च्या तुलनेत अधिक आहे तरी देखील प्रवाशांनी या गाडीला अगदी डोक्यावर धरून ठेवले आहे. हेच कारण आहे की, देशातील सर्वच महत्त्वाच्या रेल्वे मार्गावर ही गाडी सुरू करण्याचा अट्टहास केंद्र शासनाने धरला आहे.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; आता मुंबई ते कल्याण डोंबिवलीचा प्रवास होणार सुसाट, ‘हा’ मार्ग लवकरच होणार सुरु, पहा…..
आतापर्यंत देशात एकूण पंधरा वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्या आहेत आणि येत्या काही दिवसात देशात नवीन 30 वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहेत. 15 ऑगस्ट 2023 पर्यंत जवळपास 75 वंदे भारत एक्सप्रेस नव्याने भारतीय रेल्वे देशातील सर्वच महत्त्वाच्या मार्गावर सुरू करेल अशी माहिती देखील केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या माध्यमातून नुकतीच समोर आली आहे.
आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रात एकूण चार वंदे भारत एक्सप्रेस सुरू असून लवकरच आणखी तीन वंदे भारत एक्सप्रेस आपल्या महाराष्ट्राला मिळणार आहेत. यामध्ये मुंबई ते मडगाव, मुंबई ते उदयपूर आणि पुणे ते सिकंदराबाद यादरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश राहणार आहे. मात्र आता या वंदे भारत गाडी संदर्भात एक मोठी माहिती समोर येत आहे. वास्तविक ही गाडी 180 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्यास सक्षम आहे.
पण या गाडीला 130 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत प्रत्यक्षात ही वंदे भारत एक्सप्रेस किमान 130 किलोमीटर प्रतितास या वेगाने तरी धावते का? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान आता या प्रश्नाचे उत्तर समोर आले आहे. माहिती अधिकाराअंतर्गत या संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वंदे भारत एक्सप्रेस ही जरी 130 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्यासाठी परवानगी प्राप्त ट्रेन असली तरीदेखील ही गाडी केवळ सरासरी 83 किलोमीटर प्रति तास या वेगाने देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे मार्गांवर धावत आहे. या माहिती अधिकारांतर्गत मागवण्यात आलेल्या माहितीमध्ये असं सांगितले गेले आहे की, ही गाडी देशात 2021-22 मध्ये सरासरी ८४.४८ किमी प्रतितास या गतीने धावली आहे, तर २०२२-२३ मध्ये ८१.३८ किमी प्रतितास या गतीनेच या गाडीने प्रवास केला आहे.
हे पण वाचा :- अवकाळी पाऊस केव्हा घेणार विश्रांती ! पंजाबराव डख यांनी दिली मोठी माहिती, पहा काय म्हटले Punjabrao?
म्हणजे ही गाडी 100 किलोमीटर प्रति तास या गतीने देखील धावू शकली नाही. या माहितीच्या अधिकारामध्ये मुंबई सीएसएमटी-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसच्या सरासरी वेगाबद्दल देखील सांगितले गेले आहे. यामध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुंबई-साईनगर शिर्डी या गाडीला सर्वात कमी म्हणजे, सुमारे ६४ किमी प्रतितास एवढा सरासरी वेग आहे. तसेच नवी दिल्ली-वाराणसी वंदे भारत एक्स्प्रेस सर्वाधिक सरासरी ९५ किलोमीटर प्रतितास वेगाने धावते.
त्याचप्रमाणे राणी कमलापती (हबीबगंज) – हजरत निजामुद्दीन वंदे भारत एक्स्प्रेस ९४ किमी प्रतितासाच्या सरासरी वेगासह धावते. एकंदरीत वंदे भारत एक्सप्रेसचं नाव मोठं आणि लक्षण खोटं अशीच गत पाहायला मिळत आहे. मात्र रेल्वे अधिकाऱ्यांनी वंदे भारत एक्सप्रेस ही शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेसच्या तुलनेत अधिक गतिमान असल्याचा दावा केला आहे.