Vande Bharat Express Train : गेल्या पाच वर्षांच्या काळात म्हणजेच जेव्हापासून वंदे भारत एक्सप्रेस लॉन्च झाली आहे तेव्हापासून या ट्रेनची संपूर्ण देशभर चर्चा आहे. कधी या गाडीच्या वेगाची तर कधी या गाडीच्या तिकीट दराची चर्चा असते. तर कधी या गाडीवर होत असणाऱ्या दगडफेकीची चर्चा असते. ही गाडी 160 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावण्यास सक्षम असून आत्तापर्यंत देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.
मात्र या गाडीचे तिकीट दर हे इतर एक्सप्रेस ट्रेनच्या तुलनेने खूपच अधिक आहेत. मात्र तिकीट दर अधिक असतानाही या गाडीने प्रवास करणे अनेकांना आवडते. लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सारेच जन या गाडीच्या प्रवासाचे चाहते आहेत.
यामुळे आगामी काळातही देशातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. विशेष म्हणजे वंदे भारत एक्सप्रेसच्या अभूतपूर्व यशानंतर आता याचे स्लीपर वर्जन देखील येणार आहे.
या गाडीचे स्लीपर व्हर्जन पुढल्या महिन्यात लॉन्च होणार अशी शक्यता आहे. ही गाडी देशातील लांब पल्ल्याच्या मार्गावर चालवली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिंदुस्थानातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन ही आपल्या महाराष्ट्राला मिळणार आहे.
राजधानी मुंबईला देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन मिळणार असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. मुंबई ते सिकंदराबाद यादरम्यान ही गाडी चालवली जाऊ शकते. केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या जीएमला यां मार्गावर ही गाडी चालवण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
तसेच सिकंदराबाद-मुंबई मार्गावर पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन चालवावी, असा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे वर्ग देखील करण्यात आला आहे. कारण की या शहरांदरम्यान सध्या एकही वंदे भारत ट्रेन धावत नाही.
यामुळे जर रेल्वे बोर्डाने हा प्रस्ताव स्वीकारला तर लवकरच मुंबई ते सिकंदराबाद दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेनने प्रवास करता येणे शक्य होणार आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनचा कमाल वेग हा १६० किमी प्रति तास एवढा राहणार आहे.
जो इतर कोणत्याही ट्रेनपेक्षा खूपचं जास्त असेल. या ट्रेनमध्ये बसण्यासाठी आणि झोपण्यासाठीची जागाही आधुनिक पद्धतीने बनवण्यात आली आहे, जेणेकरून प्रवाशांना लांबचा प्रवास करताना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.
पुण्याला मिळणार वंदे भारत एक्सप्रेस
दुसरीकडे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीला अर्थातच पुण्याला वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. पुणे ते सिकंदराबाद या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची दाट शक्यता आहे. सध्या मुंबई ते सोलापूर दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस पुण्यावरून चालवली जात आहे. या गाडीला पुणे रेल्वे स्थानकावर थांबा असल्याने पुणेकरांना आधीपासूनचं वंदे भारत एक्सप्रेस चा लाभ मिळतोय.
पण थेट पुणे रेल्वे स्थानकावरून अजूनही वंदे भारत एक्सप्रेस सुरू झालेली नाही. यामुळे जर पुणे ते सिकंदराबाद दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस चालवली गेली तर पुणे रेल्वे स्टेशन वरून देखील थेट वंदे भारत एक्सप्रेस सुटणार आहे. यामुळे नक्कीच पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.